वृत्तसंस्था
अमृतसर : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) कोठडीत गँगस्टर लॉरेन्सने अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्याने त्याची टॉप टार्गेट लिस्ट उघड केली आहे. या यादीत बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचा मॅनेजर शगनप्रीत यांचाही समावेश आहे.Gangster Lawrence Bishnoi confesses to NIA, Salman Khan and Musewala’s manager top target list
यासोबतच लॉरेन्सने फंडिंगच्या पद्धतीही सांगितल्या आहेत. इतकेच नाही तर अतिक-अश्रफ यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्सचे नावही जोडले जाऊ लागले आहे.
विशेष म्हणजे काळवीट शिकार प्रकरणापासून लॉरेन्स सलमान खानला सतत जाहीर धमक्या देत आला आहे. याशिवाय, त्याचा सहकारी विक्रमजीत ऊर्फ विकी मिड्दुखेडा याच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स मुसेवालाचा मॅनेजर शगनप्रीत सिंग याला मुख्य गुन्हेगार मानतो. यामुळेच त्याने सिद्धू मुसेवालालाही मारले आणि शगनप्रीत सिंगही त्याच्या टॉप लिस्टमध्ये आहे.
त्याचबरोबर यूपीच्या बाहुबली अतीक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येतही लॉरेन्सचे नाव येत आहे. वास्तविक, अतिक आणि अशरफ यांच्यावर ज्या जिगाना पिस्तुलने गोळ्या झाडल्या होत्या, ते अमेरिकेतून आले होते. लॉरेन्सने एनआयएला माहिती दिली आहे की, 2021 मध्ये त्याने अमेरिकेतून गोल्डी ब्रारच्या माध्यमातून गोगी टोळीला दोन जिगाना पिस्तुले दिली होती.
तुरुंगात बसून उकळतो खंडण्या
लॉरेन्सने एनआयएला सांगितले की, तो तुरुंगात बसून आपले नेटवर्क चालवत होता. लॉरेन्सने सांगितले की, राजस्थानमधील भरतपूर, पंजाबमधील फरीदकोट आणि इतर तुरुंगात राहून त्याने राजस्थानचे व्यापारी, चंदिगडचे 10 क्लब मालक, अंबालाचे मॉल मालक, दारू व्यापारी, दिल्ली आणि पंजाबचे बुकी यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत.
गोल्डी ब्रार, कला राणा यांनी तुरुंगातील या सर्वांचे फोन नंबर दिले होते. चंदिगडमधील क्लब मालकांचे नंबर गुरलाल ब्रार आणि कला जेठेडी यांनी दिले होते. गँगस्टर आनंद पालचे भाऊ विकी सिंग आणि मनजीत सिंग यांनी राजस्थानमधील अनेक क्रशर मालक आणि दगड व्यापार्यांकडून त्याच्या सांगण्यावरून पैसे गोळा केले.
Gangster Lawrence Bishnoi confesses to NIA, Salman Khan and Musewala’s manager top target list
महत्वाच्या बातम्या
- बँकांमधून आजपासून 2000 च्या नोटा मिळणार बदलून, पण धावपळीची गरज नाही; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा निर्वाळा
- 2000 ची आणण्याच्या बाजूने नव्हते मोदी, साठेबाजीचा सांगितला होता धोका, इच्छा नसूनही द्यावी लागली होती परवानगी
- मुख्यमंत्री हिमंता यांचा दावा, आसाममधून यावर्षी ‘AFSPA’ हटवण्यात येईल
- थोरला नाही, धाकटा नाही, भाऊबंदकी चालणार नाही; महाविकास आघाडीत काँग्रेसचा नवा मेरिट फॉर्म्युला!!