• Download App
    14 भाषांमध्ये तब्बल 41 कोटी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या गोरखपूरच्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार प्रदान!!Gandhi Peace Award awarded to Gita Press, Gorakhpur

    14 भाषांमध्ये तब्बल 41 कोटी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या गोरखपूरच्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार प्रदान!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : श्रीमद्भगवद्गीते सह भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 100 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या गोरखपूरच्या गीता प्रेसला आज गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोट्यावधी भारतीयांची गेल्या कित्येक पिढ्या धार्मिक आणि अध्यात्मिक जोपासना करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या गोरखपूर गीता प्रेसचे 2023 हे शताब्दी वर्ष आहे. सन 2021 मध्येच गीता प्रेस ला हा पुरस्कार जाहीर झाला होता. Gandhi Peace Award awarded to Gita Press, Gorakhpur

    1923 मध्ये स्थापित झालेली गीता प्रेस जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे, ज्याने 16.21 कोटी श्रीमद भगवद्गीतेसह 14 भाषांमध्ये 41.7 कोटी पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यामुळे कोट्यावधी भारतीयांसह जागतिक पातळीवर लाखो वाचकांची धार्मिक आणि अध्यात्मिक जोपासना करण्यात गीता प्रयत्न मोलाचा वाटा उचलला आहे.

    महसुलासाठी गीता प्रेस संस्था कधीही आपल्या प्रकाशनातील जाहिरातींवर अवलंबून राहिलेली नाही. गीता प्रेस त्याच्या संलग्न संस्थांसह, जीवनाच्या सुधारणेसाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गांधी शांतता पुरस्कार काळाच्या ज्युरीने गीता प्रेसची परवडणारी, दर्जेदार आणि दुर्मिळ पुस्तके प्रकाशित करण्यातली अमूल्य सेवा ओळखली आणि संस्थेला 2021 चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर केला होता.

    याआधी डॉ. नेल्सन मंडेला, बाबा आमटे आदी महानुभावांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला आहे.

    Gandhi Peace Award awarded to Gita Press, Gorakhpur

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!