वृत्तसंस्था
जयपूर : काँग्रेसने आयोजित केलेल्या महागाई हटाव महारॅली मध्ये आज गांधी परिवाराने हिंदुत्ववाद्यांवर जबरदस्त हल्लाबोल केला. काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हिंदुत्ववाद्यांवर जबरदस्त प्रहार केले. आज दीर्घकाळानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी प्रथमच सार्वजनिक मंचावर दिसल्या. आजारपणामुळे सोनिया गांधी या अधिक काळ निवासस्थानातूनच काम करताना दिसतात. पक्षाच्या महत्वाच्या बैठकांना देखील त्यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली आहे. परंतु आज महागाई हटाव रॅलीमध्ये त्या जयपूरमध्ये सार्वजनिक मंचावर दिसल्या आहेत. Gandhi family’s attack on pro-Hindu activists in Maharali; After a long time, Sonia Gandhi is on the public stage !!
दिल्लीमध्ये काँग्रेसच्या महागाई हटाव महारॅलीला परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेसने आपलेच सरकार असणाऱ्या राजस्थानची राजधानी जयपूरमधून महागाई हटाव महारॅली आयोजित केली आहे. या महारॅलीला प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी संबोधित केले आहे.
राहुल गांधी यांनी देशात महागाईचा भडका उडाला असताना हिंदुत्ववादी सरकार झोपले आहे, अशा शब्दांत प्रहार केला आहे. महात्मा गांधींना हिंदुत्ववाद्यांनी गोळी मारली. आमची लढाई त्या विचारसरणीशी आहे. हिंदुत्ववाद्यांचे सरकार 2014 मध्ये आले. त्यांनी जनतेचा विश्वासघात केला. महागाई वाढवली, असे सांगून राहुल गांधी यांनी विविध वस्तूंची महागाई कशी वाढली आहे त्याची यादी महारॅली मध्ये वाचून दाखविली. या महागाईला हिंदुत्ववादी सरकार जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.
शेतकरी आंदोलनात 700 शेतकरी शहीद झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागत कृषी कायदे मागे घेतले, पण त्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तेव्हा हात आखडता घेतला. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या पाठीत सुरा खुपसला, पण त्यांना मदत करायची वेळ आली तेव्हा आमच्याकडे त्या शेतकऱ्यांची यादीच नाही असे म्हणून हात वर करून ते मोकळे झाले, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले.
प्रियांका गांधी यांनी देखील केंद्रातील मोदी सरकारवर कोरडे ओढले. हे सरकार फक्त आपल्या उद्योगपती मित्रांसाठी काम करते आहे. जनतेशी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना काही देणे घेणे नाही, असे त्या म्हणाल्या. देशातील सर्वसामान्य जनता महागाईच्या महासागरात गटांगळ्या खाते आहे आणि मोदी सरकार आपल्या मित्र उद्योगपतींचे खिसे भरण्याच्या मागे लागले आहे, असे टीकास्त्र प्रियांका गांधी यांनी सोडले .
Gandhi family’s attack on pro-Hindu activists in Maharali; After a long time, Sonia Gandhi is on the public stage !!
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिका अस्मानी संकटात : पाच राज्यांत आतापर्यंत 80 हून अधिक मृत्यू, बायडेन म्हणाले – नेमक्या नुकसानीचा अंदाज लावणे अवघड
- GOPINATH MUNDE : आज मुंडे असते तर युती कायम राहिली असती…! संजय राऊत
- उद्या पंतप्रधान मोदी करणार काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन, पंगतीत बसून घेणार भोलेबाबाचा प्रसाद, असा आहे शेड्यूल
- दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटूवर बलात्काराचा आरोप, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
- महिला डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या; नागपुरात उडाली खळबळ