नववर्षाच्या निमित्ताने चीनने ज्या भागात गलवान व्हॅलीचा ध्वज उभारला आणि फडकावला, तो भाग नेहमीच आपल्या ताब्यात राहिला आहे आणि या क्षेत्राबद्दल कोणताही वाद नाही. भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. हा व्हिडिओ चीनमधून समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या अन्य नेत्यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला होता. Galvan Vally China has never hoisted a flag on Indian borders The territory that opponents call China’s infiltration is within China’s borders
प्रतिनिधी
नवी दिल्ली : नववर्षाच्या निमित्ताने चीनने ज्या भागात गलवान व्हॅलीचा ध्वज उभारला आणि फडकावला, तो भाग नेहमीच आपल्या ताब्यात राहिला आहे आणि या क्षेत्राबद्दल कोणताही वाद नाही. भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. हा व्हिडिओ चीनमधून समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या अन्य नेत्यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
लष्कराच्या सूत्रांनी मीडियाला सांगितले की, चीनने सोशल मीडियावर ज्या भागात चीनचा ध्वज फडकावला होता, त्याबाबत कोणताही वाद नाही. हा भाग सुरुवातीपासून चीनच्या ताब्यात आहे. दुसऱ्या शब्दांत चीनने आपल्याच क्षेत्रात ध्वज फडकावला आहे. भारत-चीन सीमा वाद सुरू असलेल्या गलवान नदीच्या परिसरात त्यांनी ध्वज फडकवला नाही.
व्हिडिओनंतर वाद सुरू झाला
चीनच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाऊंटवरून गलवानमध्ये चीनचा ध्वज फडकावल्याचा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर वाद सुरू झाला. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 2022च्या पहिल्या दिवशी चीनचा ध्वज गलवान व्हॅलीवर फडकत आहे. हा ध्वज खास आहे कारण तो एकदा बीजिंगमधील तियानमेन स्क्वेअरवर फडकला होता.
काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आपला तिरंगाच गलवानवर चांगला दिसतो. चीनला उत्तर द्यावे लागेल. मोदीजी, मौन सोडा. त्याच वेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. यांनी सोशल मीडियावर लिहिले की, नवीन वर्षाच्या निमित्ताने भारताच्या गलवान व्हॅलीमध्ये चीनचा ध्वज फडकवण्यात आला. 56 इंच चौकीदार कुठे आहे?
नववर्षानिमित्त भारत आणि चिनी सैनिकांनी आपसात वाटली मिठाई
भारतीय सैनिक आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या सैनिकांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी LAC वर वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यासोबतच हॉट स्प्रिंग्स, डेमचोक, नथु ला, कोंगारा ला, केके पास, डीबीओ, बॉटलनेक, कोंकला, चुशुल मोल्डो, बूम ला आणि वाचा दमाई येथे दोन्ही सैन्याने आपसात मिठाई वाटून नवीन वर्षाचा आनंद व्यक्त केला.
Galvan Vally China has never hoisted a flag on Indian borders The territory that opponents call China’s infiltration is within China’s borders
महत्त्वाच्या बातम्या
- गलवान खोऱ्यावर चीनचा पुन्हा दावा, चिनी सैनिकांनी ध्वज फडकावला, राहुल गांधी म्हणाले- ‘मोदीजी, मौन सोडा!’
- Lakhimpur Violence : लखीमपूर प्रकरणात एसआयटीचे ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल, गृह राज्यमंत्र्यांच्या मुलगा मुख्य आरोपी
- मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या बस सीमेवरून माघारी महाराष्ट्रात धाडल्या ; शेकडो प्रवाशांची कुचंबणा
- शस्त्रक्रियेला जाण्याच्या ऐनआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केला होता फोन, काय झालं बोलणं? अनिल थत्तेंनी केला हा दावा!
- पदव्युत्तर वैद्यकीय “नीट” परीक्षा : आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा विषय लवकर मार्गी लावा; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाला विनंती