• Download App
    गडकरींच्या खात्याचा विश्वविक्रम :75 किमीचा रस्ता अवघ्या 5 दिवसांत तयार, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद|Gadkari's world record: 75 km road completed in just 5 days, Guinness World Record

    गडकरींच्या खात्याचा विश्वविक्रम :75 किमीचा रस्ता अवघ्या 5 दिवसांत तयार, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) 75 किमीचा रस्ता 105 तास 33 मिनिटांत (5 दिवसांत) बांधून इतिहास रचला आहे. NHAI ने विक्रमी वेळेत NH-53 मध्ये येणार्‍या अमरावती ते अकोला विभागातील सिंगल लेनमध्ये 75 किलोमीटर बिटुमिनस कॉंक्रिटचे उत्पादन करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ही माहिती दिली.Gadkari’s world record: 75 km road completed in just 5 days, Guinness World Record

    ते म्हणाले की, 720 कर्मचार्‍यांनी हा रस्ता तयार केला असून त्यात सल्लागारांच्या टीमचा समावेश आहे. टीमने रात्रंदिवस काम केले. 75 किमी सिंगल लेन बिटुमिनस काँक्रीट रस्त्याची एकूण लांबी 37.5 किमी दोन-लेन पक्क्या रस्त्याच्या समतुल्य आहे. 3 जून रोजी सकाळी 7 वाजता सुरू झालेले रस्त्याचे काम 7 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण झाले.



    नितीन गडकरी केले NHAIच्या टीमचे अभिनंदन

    या यशाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी NHAIचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, NHAIने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ दरम्यान, NHAIने अमरावती ते अकोला या एकाच लेनमध्ये 75 किमी अखंड बिटुमिनस काँक्रीट रस्त्याचे बांधकाम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

    2019 मध्ये 25.275 किमीचा विक्रम

    यापूर्वी, कतारमधील दोहा येथे फेब्रुवारी 2019 मध्ये बिटुमिनस रस्ते बांधणीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्यात आला होता. येथे 25.275 किमीचा रस्ता करण्यात आला. ते तयार करण्यासाठी 10 दिवस लागले. अमरावती ते अकोला विभाग हा NH-53चा भाग आहे. कोलकाता, रायपूर, नागपूर आणि सुरत या प्रमुख शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा पूर्व कॉरिडॉर आहे.

    राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सर्व अभियंते, कंत्राटदार, सल्लागार, कामगार यांचेही गडकरींनी अभिनंदन केले ज्यांनी हा विश्वविक्रम यशस्वीपणे पूर्ण होण्यास मदत केली.

    Gadkari’s world record: 75 km road completed in just 5 days, Guinness World Record

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची