• Download App
    G20 च्या बड्या पाहुण्यांना भारत मंडपम मध्ये राष्ट्रपतींची शाकाहारी शाही मेजवानी!! G20 meeting President's vegetarian royal banquet at Bharat Mandapam

    G20 च्या बड्या पाहुण्यांना भारत मंडपम मध्ये राष्ट्रपतींची शाकाहारी शाही मेजवानी!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : G20 सदस्य देशांच्या बड्या पाहुण्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत मंडप मध्ये शाकाहारी शाही मेजवानी दिली. यामध्ये प्रामुख्याने कडधान्यांचा समावेश होता. जागतिक पातळीवरची अन्न सुरक्षा मजबूत करायची असेल, तर केवळ एकच एक धान्य पिकवून चालणार नाही, तर कडधान्यांचाही पीक पद्धतीत समावेश करावा लागेल, असा संदेश या शाही मेजवानीच्या निमित्ताने भारताने जागतिक नेत्यांना दिल्याची चर्चा आहे.  G20 meeting President’s vegetarian royal banquet at Bharat Mandapam

    राष्ट्रपतींनी दिलेल्या शाही मेजवानीत भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या शरद ऋतुशी संलग्न असणाऱ्या उत्तम पदार्थांचा समावेश होता. यात पात्रम, वनवर्णम, मुंबईचा पाव, बाकरखानी, मिष्टान्न मधुरिमा स्वर्ण कलश, श्री अन्न, अंबे मोहर तांदुळाचा स्वाद यांचा समावेश होता. त्याच बरोबर पेय सेवेत काश्मिरी कहावा, फिल्टर कॉफी आणि दार्जिलिंग चहाचा समावेश होता. भोजनानंतर सर्वांना चॉकलेट फ्लेवरचे पानही देण्यात आले.

    या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत मंडपमच्या शाही भोजन कक्षाबाहेर सर्व राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले. तेथे नालंदा विद्यापीठाचा सीन बॅक ड्रॉपला लावला होता. या नालंदा विद्यापीठाची माहिती पंतप्रधान मोदींनी सर्व राष्ट्राध्यक्षांना आवर्जून दिली.

    शाही भोजनात देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. ते सर्व सहभागी झाले होते.

    G20 meeting President’s vegetarian royal banquet at Bharat Mandapam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!