• Download App
    G20 G20 चे नव्या अलिप्त राष्ट्र संघटनेमध्ये रूपांतर; मोदी ठरले नेहरूंची replacement!!

    G20 चे नव्या अलिप्त राष्ट्र संघटनेमध्ये रूपांतर; मोदी ठरले नेहरूंची replacement!!

    G20 चे नव्या अलिप्त राष्ट्र संघटनेमध्ये रूपांतर; नरेंद्र मोदी ठरले जवाहरलाल नेहरूंची replacement!!, असे राजकीय चित्र दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग मध्ये भरलेल्या जी 20 शिखर परिषदेतून समोर आले.

    G20 च्या शिखर परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग वेगवेगळ्या कारणांमुळे गैरहजर राहिले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय स्थान या परिषदेत आपोआपच अव्वल बनले. पण मूळात G20 शिखर परिषदेचे राजकीय महत्त्व मात्र थोडे घसरले. G20 ही संघटना नवी अलिप्त राष्ट्र संघटना बनली, ही वस्तुस्थिती मान्य करण्यापासून पर्याय उरला नाही.

    मूळातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना G20 असो, G7 किंवा G8 असो किंवा BRICS असो, ही कुठलीच संघटना आहे, त्या स्वरूपात मान्य नाही. त्यांना स्वतःची स्वतंत्र आणि वेगळीच वैश्विक रचना अंमलात आणायची आहे. पण मुदलातच त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणातला मूलभूत वकूब कमी असल्याने ते स्वतःची स्वतंत्र आणि वेगळी वैश्विक रचना अंमलात आणू शकत नाहीत. म्हणून ते बाकीच्या संघटनांमध्ये कुठल्या ना कुठल्या काड्या घालत गैरहजर राहतात आणि हजर राहिले तर कुठली तरी विचित्र वक्तव्ये करून त्या संघटनांच्या परिषदांना आणि अजेंड्याला वेगळेच वळण देऊन टाकतात.

    – डोनाल्ड ट्रम्पचा बहिष्कार

    दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग मध्ये भरलेल्या G20 च्या शिखर परिषदेवर डोनाल्ड ट्रम्प यांनी बहिष्कार घातला. कारण दक्षिण आफ्रिकेतले सरकार गोऱ्या शेतकऱ्यांशी भेदभाव आणि वागते, असा आरोप त्यांनी केला. ज्या दक्षिण आफ्रिकेतल्या सर्वसामान्य नागरिकांनी गोऱ्यांच्या भेदभावाविरुद्ध लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले, त्याच दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांवर ट्रम्प यांनी वांशिक भेदभावाचा आरोप केला. हा सगळा उफराटा कारभार ठरला.

    – पुतिनला म्हणे अटकेची भीती

    रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांना म्हणे अटकेची भीती वाटली. म्हणून त्यांनी जोहान्सबर्गला जायचे टाळले. कारण त्यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युद्धखोर राष्ट्रप्रमुख म्हणून वॉरंट काढले हे सुद्धा त्या अर्थाने खुळचट कारण ठरले. कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काढलेले कुठलेच वॉरंट कुठल्याच देशाने कुठल्याही प्रबळ देशाच्या राष्ट्रप्रमुखाविरुद्ध अंमलात आणल्याचे एकही उदाहरण जगात नाही. तरी देखील अटकेच्या खोट्या कारणाआड लपून व्लादीमिर पुतिन यांनी जोहान्सबर्गला जायचे टाळले.

    अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांचे प्रमुखच G20 मध्ये हजर नसतील, तर आपण जाऊन काय उपयोग??, असा विचार करून शी जिनपिंग यांनी आजारपणाचे कारण देत बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळले. पण अमेरिका, रशिया आणि चीन यांनी आपले दुसऱ्या फळीतले नेते G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जोहान्सबर्गला धाडले.



    – मोदी G20 ला हजर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र जोहान्सबर्ग मधल्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिले. त्यांच्याबरोबर 20 देशांचे अन्य राष्ट्रप्रमुख किंवा पंतप्रधान या परिषदेला हजर राहिले. त्यामुळे नरेंद्र मोदींचे स्थान मात्र तिथे अव्वल ठरले. कारण भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरची भूमिका आता अधिक वरचढ ठरली. नरेंद्र मोदी हे जोहान्सबर्ग मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंची replacement ठरले.

    – नेहरूंची अलिप्त राष्ट्र चळवळ

    अमेरिका विरुद्ध रशिया यांच्यातल्या शीतयुद्धाच्या काळात जग दोन गटांमध्ये विभागले असताना विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाजच नव्हता. तुम्ही एकतर अमेरिकेच्या बाजूने असा किंवा रशियाच्या बाजूने असा, तरच तुमच्या प्रश्नांना आणि मुद्द्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून दाद मिळू शकायची. या मध्ये अमेरिका आणि रशिया यांनी तिसरा कुठला पर्याय शिल्लक ठेवला नव्हता. पण पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी पुढाकार घेऊन विकसनशील देशांची एक अलिप्त राष्ट्र चळवळ उभारली आणि त्यांना इंडोनेशिया आणि इजिप्त या देशांचा पाठिंबा मिळाला. सुकार्नो आणि नासर यांनी नेहरूंच्या बरोबरीने अलिप्त राष्ट्र परिषदांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. या अलिप्त राष्ट्र चळवळीत सामील झालेले देश गरीब होते. आर्थिक आणि सैनिकी दृष्ट्या प्रबळ नव्हते. त्यामुळे त्या चळवळीचा फार मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला नाही, पण निदान एका स्वतंत्र संघटनेचा आवाज तरी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचला होता.

    – नेहरूंची replacement

    आज भारताची स्थिती तेवढी गरीब उरलेली नाही. भारताचा प्रभाव देखील तेवढा कमी राहिलेला नाही. उलट तो वाढलाय. पण तो अमेरिका, रशिया आणि चीन यांच्या बरोबरीचा झालाय, असे मानणे देखील राजकीय वस्तुस्थितीला धरून होणार नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्थान हे अमेरिकेच्या, रशियाच्या आणि चीनच्या अध्यक्षांच्या बरोबरीचे आहे, असे भारतीयांनी जरी मानले तरी विशिष्ट सन्मान देण्याच्या पलीकडे ते बरोबरीचे नाही, ही राजकीय वस्तुस्थिती आहे. या अर्थाने सुद्धा G20 शिखर परिषदेत नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरूंची replacement ठरले, ही वस्तुस्थिती जोहान्सबर्ग मधून समोर आली. जवाहरलाल नेहरूंनी तिसऱ्या जगाचा आवाज आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेला. नरेंद्र मोदी नव्या भारताचा आवाज नव्या अलिप्त राष्ट्र संघटनेच्या व्यासपीठावरून मोठा करत आहेत.

    G20 in new form of non aligned movement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Udhayanidhi Stalin : उदयनिधी स्टॅलिन म्हणाले- संस्कृत मृत भाषा, तमिळची चिंता, मग हिंदी का लादत आहात? भाजपने म्हटले- तमिळमध्येही अनेक संस्कृत शब्द

    नाराज बिराज काही नाही, एकनाथ शिंदेही तेवढेच “तयार”; भाजपला जे जमले नाही ते करून दाखविणार!!

    New Labour Code : देशात कामगार कायद्यांऐवजी 4 नवीन कामगार संहिता लागू;आता एका वर्षाला ग्रॅच्युइटी