विशेष प्रतिनिधी
लखनऊ: उत्तर प्रदेशच्या राजकारणातील बाहुबली नेता असलेल्या मुख्तार अन्सारीने यावेळची विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्तार अन्सारी हा सध्या कारागृहात असून यावेळी मऊ मतदारसंघातून त्याचा मुलगा अब्बास अन्सारी हा निवडणूक लढणार आहे.Fwd: Not Bahubali Mukhtar Ansari but his son will contest the election
मऊ मतदारसंघातून मुख्तार अन्सारी याचा मुलगा अब्बास अन्सारी याने उमेदवारी अर्ज दाखल केला. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीकडून ( सुभासपा ) अब्बास अन्सारी हा मऊच्या आखाड्यात आपले नशीब आजमावणार आहे. मऊ येथून अब्बासने अर्ज दाखल केल्याने मुख्तार अन्सारी यावेळी निवडणूक लढणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षाने समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. आघाडीच्या जागावाटपात मऊ विधानसभा राजभर यांच्या पक्षाकडे आली आहे. याच जागेवर राजभर यांनी अब्बास अन्सारीला संधी दिली आहे. अब्बास हा २०१७च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाला होता. बसपाच्या तिकिटावर तो मऊ जिल्ह्यातील घोसी विधानसभा मतदारसंघातून लढला होता.
तिथे भाजपचे फागू चौहान यांनी त्याचा पराभव केला होता. फागू चौहान आता बिहारचे राज्यपाल आहेत. मऊ जिल्ह्यात सातव्या टप्प्यात ७ मार्च रोजी मतदान होणार आहे.मऊ विधानसभा मतदारसंघ हा मुख्तार अन्सारी याचा गड राहिला आहे. १९९६ पासून २०१७ पर्यंत या विधानसभा मतदारसंघात मुख्तार अन्सारीचे वर्चस्व राहिले आहे.
सलग पाचवेळा या मतदारसंघातून त्याने विजय मिळवला. गेल्यावेळी तो बसपाच्या तिकिटावर कारागृहातूनच लढला होता. गेली १५ वर्षे कारागृहात असलेल्या मुख्तारने यावेळीही निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. गेल्या आठवड्यात त्याने कोर्टाकडून त्यासाठी परवानगीही मिळवली होती.
त्यानुसार पुढील प्रक्रियासुद्धा पार पाडण्यात आली होती. मात्र, शेवटच्या क्षणी निर्णय बदलण्यात आला आणि मुख्तारच्या ऐवजी त्याचा मुलगा मऊतून लढणार असे निश्चित करण्यात आले. याबाबत मुख्तारचे वकील दारोगा सिंह यांनी अधिक माहिती दिली. यापुढे अब्बास मऊतून निवडणूक लढवेल, असे त्यांनी सांगितले. मुख्तार अन्सारी सध्या बांदा कारागृहात शिक्षा भोगत आहे.
Fwd: Not Bahubali Mukhtar Ansari but his son will contest the election
महत्त्वाच्या बातम्या
- प्रा.वामन केंद्रे यांना राष्ट्रीय कालीदास सन्मान प्रदान
- हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान ; सहयाद्री देवराईचा व्हॅलेंटाईन डे राष्ट्रीय वृक्ष वडासोबत
- भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात घडण्याची राऊतांची भाषा; प्रत्यक्षात मंत्री बच्चू कडू, खासदार राजेंद्र गावितांनाही तुरुंगवासाची शिक्षा!!
- देशातील सर्वांत मोठा बँकिंग गैरव्यवहार करणारया एबीजी शिपयार्डचे यूपीए कनेक्शन उघड… सरकारी कंपनी विकली, १० हजार कोटींची कंत्राटेही व कर्जांची खिरापतही वाटली