• Download App
    देशांतर्गत विमानसेवा सोमवारपासून पूर्ववत सुरु करण्यास हिरवा कंदील । Full fledged Domestic airlines from Monday; Green lantern to restart

    देशांतर्गत विमानसेवा सोमवारपासून पूर्ववत सुरु करण्यास हिरवा कंदील

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास हवाई वाहतूक कंपन्यांना सोमवारपासून (ता.१८) परवानगी दिली आहे. कोरोना निर्बंधांच्या शिथिलतेनंतर अर्थव्यवस्था खुली होत आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि मागणी पाहता हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला. Full fledged Domestic airlines from Monday; Green lantern to restart

    कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यावर मंत्रालयाने टप्प्याटप्प्याने विमान वाहतुकीवरील निर्बंध शिथिल केले. डिसेंबर २०२० पर्यंत ८० टक्के प्रवासी क्षमतेसह सेवा सुरू होती. दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर मार्चपासून निर्बंध आले. त्यानंतर निर्बंध हळूहळू शिथिल केले आहे.



    देशांतर्गत हवाई वाहतुकीतील कंपन्यांना चालू वर्षांत १ जून ते ५ जुलैदरम्यान ५० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतुकीस परवानग दीली होती. त्यानंतर ५ जुलै ते १२ ऑगस्टदरम्यान ती ६५ टक्के करण्यात आली, तर १२ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरदरम्यान ती ७२.५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर ८५ टक्के प्रवाशांसह देशांतर्गत उड्डाणे करण्यास परवानगी दिली होती. गेल्या आठवडय़ात ९ ऑक्टोबर रोजी विमान कंपन्यांनी २,३४० देशांतर्गत उड्डाणे केली. ती त्यांच्या एकूण कोरोनापूर्व क्षमतेच्या ७१.५ टक्के आहेत.

    तीन लाख प्रवाशांना विमान प्रवासाचा लाभ

    कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि सणासुदीचा हंगाम असल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. सप्ताहअखेरीस (९ ऑक्टोबर) देशांतर्गत दैनंदिन प्रवासी वाहतुकीने तीन लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला. एकूण ३,०४,०२० प्रवाशांना घेऊन २,३४० विमानांनी त्या दिवशी उड्डाणे केली.

    Full fledged Domestic airlines from Monday; Green lantern to restart

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी