विशेष प्रतिनिधी
मुबंई : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वत्र विरोध होत असताना इंधन दरांमध्ये रविवारी सलग पाचव्या वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. रविवारी सलग पाचव्या दिवशी लिटरमागे ३५ पैशांनी वाढ करण्यात आली. यामुळे या दोन्ही इंधनांचे दर देशभरात आजवरच्या विक्रमी पातळीवर पोहचले आहेत.
Fuel prices rose for the fifth day in a row
एक लिटर पेट्रोल भरण्यासाठी आता मुंबईत ११३.४६ रुपये द्यावे लागणार असून, दिल्लीत हेच दर १०७.५९ रुपये झाले आहेत. तर डिझेलचे दर मुंबईत दर लिटरमागे १०४.३८ रुपयांवर पोहोचले आहेत तर दिल्लीत ९६.३२ रुपयांवर पोहचले आहेत. देशातील सर्व मोठय़ा शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत डिझेलनेही ही पातळी ओलांडली आहे.
रविवारी डिझेलचे दर १०० रुपयांहून अधिक होणारे पश्चिम बंगाल हे राज्य ठरले आहे. इंधनदरांत तीन आठवडे काही बदल न होण्याची प्रक्रिया संपल्यानंतर २८ सप्टेंबरपासून पेट्रोलचे दर २१ वेळा वाढवण्यात आले आहेत. तेव्हापासून पेट्रोलचे दर लिटरला ६.४० रुपयांनी वाढले आहेत. डिझेलच्या दरांत २४ सप्टेंबरपासून २४ वेळा मिळून लिटरला ७.७० रुपयांनी वाढ झाली आहे.
Fuel prices rose for the fifth day in a row
महत्त्वाच्या बातम्या
- पाटणा मॉडेल मर्डर केस : बिल्डरच्या बायकोने सुपारी देऊन संपवलं, धक्कादायक कारण आल समोर
- महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात , म्हणाले – ‘बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’, पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं हे सरकार
- क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करणार की नाही?, आरोपांनंतर एनसीबीकडून विभागीय चौकशी, अचानक दिल्लीला बोलावले
- India T20 WC Final : टीम इंडियाला आता चारही सामने जिंकावे लागतील, उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध होऊ शकतो सामना