प्रतिनिधी
मुंबई : प्रख्यात बंडखोर बांगला लेखिका तसलीमा नसरीन यांना ख्रिसमस आणि दुर्गापूजेच्या शुभेच्छा नेमक्या कोणाकडून कडून मिळतात…??, याचा खुलासा त्यांनी स्वतः ट्विट मधून केला आहे. From whom does Taslima Nasreen get Christmas – Durga Puja greetings
माझ्या सर्व हिंदू मित्रांकडून मला ख्रिसमसच्या शुभेच्छा मिळाल्या. खूप आनंद झाला. मला हिंदू मित्र नेहमीच ख्रिसमस, ईद आणि दुर्गा पूजेच्या शुभेच्छा देत असतात. मला मुस्लिम मित्रांकडून फक्त ईदच्या शुभेच्छा मिळत असतात. परंतु ख्रिसमस आणि दुर्गापूजेच्या शुभेच्छा मुस्लिम मित्रांकडून मिळत नाहीत. ही बाब बरेच काही सांगून जाते, अशा आशयाचे ट्विट तसलीमा नसरीन यांनी केले आहे.
तसलीमा नसरीन या बंडखोर लेखिका आहेत. इस्लामी कट्टरता वादाच्या पूर्ण विरोधक आहेत. बांगलादेशात इस्लामी कट्टरतावादी नेहमी त्यांच्या हत्येचे फतवे काढत असतात. मुस्लिम मित्र फक्त ईदच्या शुभेच्छा देतात हे त्यांचे हे परखड ट्विट बरेच काही सांगून जात आहे.