• Download App
    Pakistani धमकी पासून विनंती पर्यंत पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या तोंडी आले पाणी!!

    धमकी पासून विनंती पर्यंत पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या तोंडी आले पाणी!!

    Operation sindoor च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानचा विजय झाल्याचे कितीही आव आणले असले, तरी प्रत्यक्षात धमकी पासून ते विनंती पर्यंत पाकिस्तानी नेत्यांच्या तोंडी आले पाणी!!, असेच चित्र पाकिस्तानी माध्यमांमधून दिसून आले. सिंध, बलुचिस्तान आणि पंजाब प्रांतांना पाणीटंचाईने घेरले. लाहोर, कराची, मुलतान सारख्या मोठ्या शहरांमध्ये 40 + % पाणीकपात करावी लागली. या मोठ्या आणि अन्य छोट्या शहरांच्या भोवतालच्या शेतीला पाणीटंचाईचा मोठा फटका बसला. कारण भारताने सिंधू जल करार स्थगित करून आपल्या बाजूच्या धरणांमधून हवे तेव्हा पाणी सोडायला आणि हवे तेव्हा बंद करायला नकार दिला.

    आत्तापर्यंत भारताशी चर्चा अथवा संघर्ष अथवा युद्ध करताना पाकिस्तानी नेत्यांच्या तोंडी कायम “काश्मीर” नावाचा “राग” आलापला जायचा. भारताच्या हक्काचे सिंधूचे पाणी हे पाकिस्तानी नेते प्यायचे आणि तोंडातून नेहमी गरळ ओकायचे. ते कधी गवत खाऊन अणुबॉम्ब टाकायची धमकी द्यायचे, तर कधी हिंदुस्थान वरपासून खालपर्यंत बेचिराख करायची भाषा वापरायचे. पाकिस्तानी राज्यकर्ते नेहमीच भारताशी बरोबरी किंबहुना प्रत्येक बाबतीत कुरघोडी करायचे. भारत हा गाईंचा “शांतीप्रिय” देश असला तरी आम्ही “वाघ – सिंह” आहोत, असे भासवत राहायचे. 1971 च्या युद्धात बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतरही पाकिस्तानी राज्यकर्त्यांची गुर्मीची भाषा बदलली नव्हती. जुल्फीकार अली भुट्टो यांनी “उधर तुम, इधर हम”, अशी भाषा वापरत शेख मुजिबूर रहमान यांना अप्रत्यक्षपणे स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती करायला हातभार लावला देखील होता. म्हणूनच बांगलादेश स्वतंत्र झाला हा पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आपला “पराभव” मानला नव्हता. 1971 नंतरची त्यांची भाषा गुर्मीचीच राहिली होती. 1999 च्या कारगिल युद्धानंतर देखील पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आपल्या भाषेत आणि वर्तनात बदल केला नव्हता. जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल युद्धानंतरच पाकिस्तानात लष्करी बंड घडवून सत्ता बळकावली होती.

    मात्र, 2025 च्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या तोंडी पहिल्यांदा पाण्याची भाषा आली. कारण भारताने सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे नाक दाबले म्हणून आता त्यांना पाण्यासाठी तोंड उघडावे लागले.

    पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारताशी चर्चा करण्याचा प्राधान्यक्रम ठरवताना फार मोठा फेरबदल करून काश्मीरच्या खालोखाल पाणीवाटपाच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. कारण 1948, 1965, 1971, 1999 या चारही युद्धांच्या काळात किंवा त्यानंतर भारताने खऱ्या अर्थाने पाकिस्तानचे “नाक” दाबलेच नव्हते. ते 2025 मध्ये सिंधू जल करार स्थगित करून दाबले. त्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने पाण्याची “राजकीय आणि सैनिकी” किंमत कळली.

    – आधी धमकी, आता विनंती

    आपण भारताशी संघर्ष करताना अणुबॉम्ब किंवा अन्य कुठल्याही हत्यारांची भाषा वापरली, तरी आता भारत ऐकणार नाही. कारण तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐकण्याच्या स्थितीतच ठेवलेला नाही, हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आता कळून चुकले. म्हणूनच शहाबाज शरीफ, बिलावल भुट्टो, मरियम नवाज यांच्यासारख्या पाकिस्तानी नेत्यांच्या तोंडी सुरुवातीला पाणी हत्यारासारखे वापरू नका, अन्यथा आम्हालाही संघर्ष करावा लागेल, अशी धमकीची भाषा आली. सिंधू नदीत पाणी वाहणार नसेल, तर भारतीयांचे रक्त वाहील, अशी धमकी जुल्फिकार अली भुट्टोंचा नातू बिलावल भुट्टोने दिली, पण असल्या धमक्यांना भारताने भीक घातली नाही हे लक्षात येताच पाकिस्तानची धमकीची भाषा विनंतीत बदलली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात “त्रयस्थ” ठिकाणी चर्चा करू. सौदी अरेबियात चर्चेचे ठिकाण शोधू असे म्हणताना शहाबाज शरीफ यांनी पाणीवाटपाचा मुद्दा काश्मीरच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर घुसविला.

    कारण पाकिस्तानात पाण्यावरून आग पेटली. त्या आगीने सिंध प्रांत पेटविला आणि त्याची धग पंजाबी लष्करी वर्चस्वाला लागली. सिंध मधली आग थांबली नाही, तर पंजाब मध्ये घुसून आग लावायला कमी करणार नाही, अशी तयारी पाकिस्तानात झाल्याचे दिसू लागले म्हणून पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या तोंडी काश्मीर खालोखाल व्यापार किंवा दहशतवाद या मुद्द्यांची भाषा येण्यापेक्षा पाणीवाटपाची भाषा आली.

    अर्थात, या सगळ्या बातम्यांचे पडसाद भारतीय माध्यमांमध्ये उमटले नाहीत, तर ते पाकिस्तानी माध्यमांमध्ये उमटले. The Dawn, Pakistan Today, Friday Times, Jung, Geo News यांचे रकाने आणि digital media पाकिस्तानातल्या पाणीटंचाईच्या बातम्यांनी आणि फोटोंनी भरले. पाकिस्तानी राज्यकर्त्यांवर त्यांचा दबाव वाढला‌‌. म्हणूनच त्यांच्या तोंडी प्राधान्यक्रमात वरच्या स्थानावर पाणीवाटपाचा मुद्दा आला. भारताने “नाक” दाबल्याचा खरा परिणाम “असा” दिसला.

    From threats to requests, Pakistani rulers’ mouths watered!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भारताचा चिकन नेक आवळायची बांगलादेशाची भाषा; पण भारतानेच “विशाल मन” दाखवायचा माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा सल्ला; स्वदेशावर अवसानघातकी “हल्ला”!!

    Moscow airport : युक्रेनचा मॉस्को विमानतळावर ड्रोन हल्ला, भारतीय खासदार लँड होणार होते

    Randhir Jaiswal : परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- संवाद आणि दहशतवाद सोबत चालू शकत नाही; पाकसोबत फक्त द्विपक्षीय चर्चा