विशेष प्रतिनिधी
हिंगोली :धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण सरकारी नोकरीच्या मागे धावत आहे. नोकरी न लागल्यामुळे हताश होऊन अनेकजण वाम मार्गाकडे वळत आहेत.परंतु हिंगोली जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित तरुणाने गुळाच्या चहाच्या व्यवसायातून प्रगती केली आहे.
प्रमोद मैंद, असे या या तरुणाचे नाव आहे. रिधोरा येथील तो रहिवासी आहे. त्याने स्वयंरोजगारातून प्रगती करून अन्य तरुणासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाचे हिंगोली जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
अल्पभूधारक असलेले प्रमोद मैंद यांनी परिस्थितीवर मात करत MA B ed पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परंतु परिस्थिती बेताची असल्यामुळे सरकारी नोकरीच्या मागे न धावता गुळाच्या चहाचा व्यवसाय करून महिन्याकाठी ते सध्या ४५ ते ५० हजार रुपये कमावत अाहेत.
- गुळाच्या चहातून महिना पन्नास हजारांचे उत्पन्न उलाढाल
- हिंगोलीतील एका उच्चशिक्षित तरुणाचा उपक्रम
- प्रमोद मैंद, असे या या तरुणाचे नाव आहे
- अल्पभूधारक असताना MA B ed पर्यंतचे शिक्षण
- सरकारी नोकरीऐवजी स्वयंरोजगाराची वाट धरली