विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेनंतर राष्ट्रवादीत आधीच दादा विरुद्ध ताई राजकीय स्पर्धा तयार झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देताना आपल्या नवीन राजकीय प्रवासाची दिशा सूचकपणे दाखवून दिली आहे. From Sharad Pawar to The New BJP dr. Amol Kolhe shows his new political way
आपल्या फेसबुक अकाउंट वर त्यांनी जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देताना, “विचारधारा कोणतीही असो ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरु कोण?,” अशी पोस्ट लिहिली आहे आणि त्या पोस्ट बरोबरच दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ते शरद पवारांच्या भाषणांचे संकलन असलेले “नेमकेचि बोलणे” हे पुस्तक वाचत आहेत, तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या हातात “द न्यू बीजेपी” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची वाटचाल विशद करणारे पुस्तक ते वाचत असल्याचे दाखविले आहे.
डॉ. अमोल कोल्हे हे प्रखर वक्ते उत्तम अभिनेते तर आहेतच, पण त्या पलीकडे जाऊन स्वतःच्या राजकीय भवितव्याविषयी जाहीर चर्चा न करता अत्यंत सूचक पद्धतीने हालचाली करण्यात माहीर मानले जाणारे नेते आहेत.
गेल्या काही ते शिरूर मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर दोनच वर्षांमध्ये त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. सोशल मीडिया अकाउंट वर त्यांनी अनेकदा राष्ट्रवादी पासून आपण विशिष्ट अंतर राखत असल्याचे दाखवूनही दिले. राष्ट्रवादीच्या कोणत्याही मोठ्या बैठकांमध्ये अथवा निर्णय प्रक्रियेमध्ये ते सहभागी नसतात. इतकेच काय तर माध्यमांमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या स्टार प्रचारकांची यादी तयार करून पाठवली जाते, त्या यादीतही अमोल कोल्हेंचे नाव नसते. ज्यावेळी मोठ्या निवडणुका अथवा राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठक असतात, त्यावेळी अमोल कोल्हे त्यांच्या महानाट्याच्या प्रयोगात व्यस्त असतात असे अनेकदा दिसले आहे.
अमोल कोल्हे यांच्या प्रत्येक हालचालींमधून काहीतरी सूचित होत असते असे अनेकदा लिहिले आणि बोलले गेले आहे. असेच आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानेही घडले आहे. आपण कोणत्याही विचारधारेचा “मोकळेपणाने” विचार करू शकतो असेच सूचक पद्धतीने अमोल कोल्हे यांनी आजचे फोटो शेअर करताना स्पष्ट केले आहे. भविष्यात अमोल कोल्हे कोणती आणि कोठून निवडणूक लढवणार? त्यासाठी कोणता पक्ष निवडणार? याची यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
From Sharad Pawar to The New BJP dr. Amol Kolhe shows his new political way
महत्वाच्या बातम्या
- सत्यपाल मलिकांना मिळालेल्या CBIच्या समन्सवर गृहमंत्री अमित शाहांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- … ही तर वरवरची मलमपट्टी: गांभीर्य असेल तर आरक्षण मर्यादेविषयी भूमिका स्पष्ट करा! अशोक चव्हाण
- … तेव्हा राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती का?; हिंदु जनजागृती समितीचा सवाल
- अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…