ग्राहक आता आपल्या बॅँकेच्या एटीएममधून महिन्यातून केवळ पाच वेळा विनाशुल्क पैसे काढू शकणार आहे. त्यानंतरच्या व्यवहारावर शुल्क द्यावे लागणा आहे. त्याचबरोबर एटीएम इंटरचेंज शुल्क १५ रुपयांहून १७ रुपये वाढविले आहे.From now on, you can withdraw money from ATMs free of cost only five times a month
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ग्राहक आता आपल्या बॅँकेच्या एटीएममधून महिन्यातून केवळ पाच वेळा विनाशुल्क पैसे काढू शकणार आहे. त्यानंतरच्या व्यवहारावर शुल्क द्यावे लागणा आहे. त्याचबरोबर एटीएम इंटरचेंज शुल्क १५ रुपयांहून १७ रुपये वाढविले आहे.
यापूर्वी एटीएमच्या शुल्क रचनेत २०१२ मध्ये बदल करण्यात आला होता. त्याचबरोबर २०१४ मध्ये ग्राहकांनासाठी ट्राजॅक्शन शुल्क केले होते. मात्र, आता एटीएम वर होणाऱ्या खर्चाचा विचार करून शुल्क पुनर्रचना करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बॅँकेने काढलेल्या आदेशात म्हयले आहे की ग्राहक आपल्या स्वत:च्या बॅँकेतून प्रत्येक महिन्याला पाच वेळा विनाशुल्क पैसे काढू शकतात. अन्य बॅँकेच्या एटीएममधून व्यवहार केले तर मेट्रो शहरात तीन तर बिगर मेट्रो शहरात पाच वेळा व्यवहार करू शकतात. त्यापुढच्या व्यवहारांवर शुल्क द्यावे लागणार आहे.
१ आॅगस्ट २०२१ पासून नवीन नियम लागू केले जाणार आहेत.सध्या ज्या बॅँकेचे कार्ड आहे त्याशिवाय दुसऱ्या बॅँकेच्या एटीएममधून पैसे काढले तर बॅँकेला १५ रुपये इंटरचेंज फी म्हणून द्यावी लागते.
पैसे काढण्याशिवाय इतर व्यवहार उदा. बॅलन्स चेक केला तर पाच रुपये फी आहे. आता ही फी १७ रुपये झाली आहे. त्यामुळे आता मोफत असलेल्या पाच व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार केले तर ग्राहकांना सतरा रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.
From now on, you can withdraw money from ATMs free of cost only five times a month