• Download App
    पुढील आठवड्यापासून कोरोना प्रतिबंधक स्फुटनिक व्ही लस बाजारात, दरवर्षी ८५ कोटी डोसचे उत्पादन होणार|From next week, the corona preventive Sputnik V vaccine in market, will produce 85 crore doses

    पुढील आठवड्यापासून कोरोना प्रतिबंधक स्फुटनिक व्ही लस बाजारात, दरवर्षी ८५ कोटी डोसचे उत्पादन होणार

    कोरोना प्रतिबंधक रशियन लस स्फुटनिक व्हीची दुसरी खेपही भारतात दाखल झाली आहे. पुढील आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. या लसीची किंमत ९९५ रुपये आहे.From next week, the corona preventive Sputnik V vaccine in market, will produce 85 crore doses


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक रशियन लस स्फुटनिक व्हीची दुसरी खेपही भारतात दाखल झाली आहे. पुढील आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. या लसीची किंमत ९९५ रुपये आहे.

    कोरोनाच्या दुसºया लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींचा पुरवठा कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर रशियन स्फुटनिक व्ही लसीलाही भारतात परवानगी देण्यात आली आहे.



    भारतातील रशियाचे राजदूत एन. कुदाशेव यांनी सांगितले की ही एक रशियन-भारतीय लस आहे. हळहळू भारतात या लसीचे उत्पादन वाढवून ८५ कोटी डोस प्रति वर्ष करण्यात येईल.

    तसेच भारतात लवकरच सिंगल डोस लस स्पुटनिक लाईट ही लसही आणली जाणार आहे. भारतात लसीचं उत्पादन तेजीनं वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.रशियामध्ये जुलै २०२० पासून लोकांच्या लसीकरणासाठी याच लसीचा वापर करण्यात येत आहे.

    ही लस तिच्या प्रभावीपणासाठी जगभरात ओळखली जाते. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या विरोधातही ही लस काम करणार असल्याचे रशियाच्या शास्त्रज्ञांनी सिध्द केल्याचे कुदाशेव यांनी सांगितले.

    डॉ. रेड्डीज ही औषध निमार्ता कंपनी रशियाची ही लस भारतात बनविणार असून मेक इन इंडियाची ही लस आणखी स्वस्त मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या या लसीची किंमत ९९५ रुपये आहे.

    From next week, the corona preventive Sputnik V vaccine in market, will produce 85 crore doses

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची