• Download App
    मिस युनिव्हर्स - मिस वर्ल्ड ते नाटू नाटू - द एलिफंट व्हिस्पर्स "ऑस्कर"; 29 वर्षानंतर भारतासाठी ड्रीम इयर!! From miss universe - miss world to naatu naatu and the elephant whispers; dream year for India after 29 years!!

    मिस युनिव्हर्स – मिस वर्ल्ड ते नाटू नाटू – द एलिफंट व्हिस्पर्स “ऑस्कर”; 29 वर्षानंतर भारतासाठी ड्रीम इयर!!

    विशेष प्रतिनिधी

    2023 हे भारतासाठी ऑस्कर ड्रीम इयर ठरले आहे. हा सुवर्ण योग तब्बल 29 वर्षानंतर भारताच्या वाट्याला आला आहे. 1994 मध्ये सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांच्या रूपाने असेच ड्रीम इयर भारतात अवतरले होते, ते मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड पुरस्काराच्या निमित्ताने!! From miss universe – miss world to naatu naatu and the elephant whispers; dream year for India after 29 years!!

    1994 मध्ये सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांनी मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड हे पुरस्कार जिंकून भारताची मोहोर जगावर उमटवली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जागतिक सौंदर्य म्हणजेच भारतीय सौंदर्य हा निकष बनला. मग युक्ता मुखी, दिया मिर्झा, डायना हेडन, प्रियांका चोप्रा या वर्ल्डच्या युनिव्हर्स तरी झाल्या किंवा मिस तरी झाल्या!! इतकेच काय पण आदिती गोवित्रीकर हिच्या रूपाने भारताने मिसेस युनिव्हर्स पुरस्कारावर देखील आपली मोहोर उमटवली.

    भारत जागतिक पातळीवर त्यावेळी चर्चेत आला. भारताने खुली अर्थव्यवस्था 1990 च्या दशकात स्वीकारली. त्याचा परिणाम म्हणून जगाने भारतीय कला क्षेत्राची घेतलेली ती दखल होती. पण तेव्हा देखील समाजवादी मनोवृत्तीच्या लोकांनी त्यावर जगाची मार्केटिंग पॉलिसी अशीच असते, अशा शब्दांमध्ये टीका केली होती. पण त्या टीकेकडे दुर्लक्ष करून भारतीय समाज पुढे जातच राहिला. त्याचेच आता ऑस्करच्या पुरस्कारांपर्यंत येऊन पोहोचणे हे रूपांतर आहे.

    भारताने याआधी ऑस्कर पुरस्कार मिळवलेच नव्हते असे नाही गांधी सिनेमाच्या कॉस्च्युम डिझाईनर म्हणजे वेशभूषाकार भानू अथैय्या यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित केले होतेच. बंगाली आणि भारतीय सिनेमाचे भीष्म पितामह सत्यजित राय यांना ते अंथरुणावर खेळलेले असताना जीवनगौरव पुरस्कार देऊन ऑस्करने गौरवले होते.

    लगान, स्वदेश यासारख्या अनेक भारतीय सिनेमांना ऑस्करचे नामांतर जरूर मिळाले आहे, पण भारतीय सिनेमाला मात्र पूर्णांशांने ऑस्कर जिंकण्याचा मान पूर्णांशाने अद्याप मिळालेला नाही. आता देखील नाटू नाटू या गाण्याच्या रूपाने आणि द एलिफंट व्हिस्पर्स या शॉर्ट फिल्मच्या रूपाने भारताने ऑस्कर वर आपली मोहोर जरूर उठवली आहे, पण संपूर्ण सिनेमाला ऑस्कर मिळवून ही मोहोर अद्याप उमटवायची आहे. त्याची आशा करोडो भारत यांना उत्तम कला निर्मितीसाठी प्रेरणा देत राहील.

    From miss universe – miss world to naatu naatu and the elephant whispers; dream year for India after 29 years!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!