प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातचा शंभरावा एपिसोड लंडन पासून न्यूयॉर्क पर्यंत आणि बिलेनियर उद्योगपतींपासून ते मुंबई सेंट्रलच्या कुली बांधवांपर्यंत संवादाची एक अनोखी साखळी ठरला. देशभरातील 400000 सेंटर्स तसेच परदेशातली काही हजार सेंटर येथे एकाच वेळी मन की बातच्या 100 व्या एपिसोडचे ब्रॉडकास्ट करण्यात आले. यात लंडन पासून न्यूयॉर्क पर्यंत ते बिलेनियर उद्योगपतींपासून मुंबई सेंट्रलच्या खोली बांधवांपर्यंत सर्वांनी मोदींची मन की बात ऐकली. लंडनच्या इंडिया हाऊस पासून ते संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयातील ट्रस्टीशिप कौन्सिल चेंबर मध्ये एपिसोडचे आयोजन करण्यात आले होते. From London to New York, from industrialists to the coolies of Mumbai Central
शंभराव्या मन की बातमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “शंभराव्या पर्वाबाबत हजारो पत्र आणि मेसेज आले आहेत. ही पत्रं वाचून माझं मन भावूक झालं. मन की बातचे शंभर भाग पूर्ण केल्याबाबत अनेकांनी माझं अभिनंदन केलं, पण खरे अभिनंदनाचे पात्र श्रोते आहेत. मन की बातच्या माध्यमातून अनेक जनआंदोलन सुरू झाली. ‘मन की बात’शी संबंधित विषय जनआंदोलन बनला. खेळणी उद्योगाची पुनर्स्थापना करण्याचं मिशन मन की बात या माध्यमातूनच सुरू झालं. आपले भारतीय श्वान म्हणजेच, देशी श्वानांबाबत जागरुकता निर्माण करण्याची सुरुवातही मन की बातने झाली. अशाप्रकारे प्रत्येक समाजात परिवर्तनाचं कारण मन की बात बनली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओ कार्यक्रम मन की बातचा रविवार ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता १०० वा भाग प्रसारित झाला. या ऐतिहासिक क्षणासाठी भाजपकडून देशभरात जय्यत तयारी करण्यात आली. या कार्यक्रमाचे न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्र मुख्यालयासह देश-विदेशात 400000 ठिकाणी प्रसारण झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित विले-पार्ले येथे बसून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, तर दुसरीकडे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई सेंट्रल येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई सेंट्रल येथील १०० कुली बांधवांना एकत्रित ”मन की बात” (Mann Ki Baat 100) हा कार्यक्रम ऐकता यावा याची सोय केली होती.
From London to New York, from industrialists to the coolies of Mumbai Central
महत्वाच्या बातम्या
- Watch : PM मोदींच्या ‘मन की बात’च्या 100 व्या भागाची कशी झाली तयारी? पाहा पडद्यामागील काही अद्भुत क्षण…
- ‘Mann Ki Baat @ 100’ : बिल गेट्स यांनी “मन की बात”च्या शतकाबद्दल पंतप्रधान मोदींना दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
- मन की बात @100 : मुंबईत भाजपचे 5000 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन
- भाजपचे टॉप बॉसेस कर्नाटकच्या रणमैदानात व्यग्र; विरोधकांचे बॉसेस कुस्तीगीर आंदोलनाला चिथावणी देण्यात व्यस्त!!