• Download App
    Freedom to Fly : निष्पाप पक्ष्यांची तस्करी ; वास्तव दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल ;स्वातंत्र्य असं दिसतं-आयएफएस ऑफिसरची खास विनंती। Freedom to Fly: Smuggling of innocent birds

    Freedom to Fly : निष्पाप पक्ष्यांची तस्करी ; वास्तव दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल ;स्वातंत्र्य असं दिसतं-आयएफएस ऑफिसरची खास विनंती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : प्राणी पक्षी यांच्याविषयी प्रेम आपल्याला नेहमीच वाटते .त्यांना पाळण्याची विशेष आवडही अनेकांना असते. मात्र विकत घेतले जाणारे हे प्राणी पक्षी तस्करी करून आनले जातात . काही लोक कोणतीही माहिती न घेता, शहानिशा न करता केवळ प्रेमापोटी पालनाकरिता प्राणी, पक्षी घरी घेऊन येतात. या निष्पाप प्राणी, पक्ष्यांची विक्री करण्यापूर्वी त्यांना कशा अवस्थेत ठेवलं जातं याविषयी अनेक जण अनभिज्ञ असतात. याबाबत वास्तव दर्शवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.आयएफएस ऑफिसरने या बाबतीत पोस्ट शेअर करत खास विनंती केली आहे. Freedom to Fly: Smuggling of innocent birds

    या व्हिडीओत पोपटांना पिंजऱ्यातून मोकळं सोडलं जातयं तर पोस्टमध्ये या पोपटांना अत्यंत निर्दयपणे पिंजऱ्यात डांबण्यात एवं आहे.असे पक्षी खरेदी करु नका अशी विनंती या अधिकाऱ्याने या पोस्टच्या माध्यमातून केली आहे. याला नेटिझन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे .

    आयएफएस ऑफिसर परवीन कासवान (IFS Officer Parveen Kaswan) यांनी त्यांच्या आधिकृत व्टिटर हँडलवरुन नुकताच शेअर केला आहे. स्वातंत्र्य असं दिसतं, अशी कॅप्शन कासवान यांनी या व्हिडीओत लिहीली आहे. या सर्व पक्ष्यांची तस्करी केली जात होती. परंतु आमच्या म्हणजे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या पक्ष्यांना रेस्क्यू करत पिंजऱ्यातून मोकळे केल्याची माहिती कासवान यांनी दिली आहे.

    हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेक लोक कमेंटमध्ये अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. याच संदर्भात या अधिकाऱ्याने अजून एक पोस्ट केली आहे. यात अनेक पोपटांना अत्यंत वाईट पध्दतीने एका पिंजऱ्यात बंद करुन ठेवल्याचं दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शन मध्ये, स्थानिक बाजारातून तुम्ही जे पक्षी खऱेदी करता, या पध्दतीने त्यांची तस्करी केली जाते. त्यांना पकडून पिंजऱ्यात डांबून ठेवलं जातं. त्रास दिला जातो. त्यामुळे हे पक्षी खरेदी करु नका, असं लिहिलं आहे.

    Freedom to Fly: Smuggling of innocent birds

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली