• Download App
    उत्तर प्रदेशात मोफत वायफाय सुविधा , योगी सरकारचा निर्णय; मोठ्या शहरात दहा तर छोट्या शहरात पाच ठिकाणी उपलब्ध Free WiFi facility in Uttar Pradesh, decision of Yogi government; Available in ten places in big cities and five places in small cities

    उत्तर प्रदेशात मोफत वायफाय सुविधा , योगी सरकारचा निर्णय; मोठ्या शहरात दहा तर छोट्या शहरात पाच ठिकाणी उपलब्ध

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेशात योगी सरकारने शहरात मोफत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या शहरात दहा ठिकाणी तर छोट्या शहरात पाच ठिकाणी ही सुविधा पुरविली जाणार आहे. Free WiFi facility in Uttar Pradesh, decision of Yogi government; Available in ten places in big cities and five places in small cities

    मोफत वायफाय सुविधेचा प्रारंभ मोठ्या पाच शहरात आणि लहान शहरात दोन ठिकाणी केला जाणार आहे. ऑक्टोम्बरच्या पहिल्या आठवड्यात या सेवेचा लाभ नागरिकांना दिला जाणार आहे.



    अपर मुख्य सचिव नगर विकास डॉ. रजनीश दुबे यांनी नगर आयुक्त व अधिशासी अधिकारी यांना या दिशेने काम करण्याचे आदेश दिले आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानकाच्या जवळ तहसील, कचेरी, ब्लाक, रजिस्ट्रार कार्यालय, मुख्य बाजार,रुग्णालय आदी ठिकाणी ही सुविधा दिली जाणार आहे, असे शासकीय आदेशात नमूद केले आहे.

    राज्य सरकारच्या मिशन युवा अंतर्गत मोफत वायफाय सेवा देण्याचे महत्वपूर्ण काम हाती घेतले आहे. दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरात दहा आणि दहा लाखपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात पाच ठिकाणी सुविधा दिली जाईल. स्मार्ट सिटीत ही सुविधा नसली तर नागरी संस्था स्वतःचा निधी वापरून ती पुरविणार आहे.

    कोणत्या शहरांचा समावेश

    लखनौ, कानपुर, आगरा, अलीगढ़, वाराणसी, प्रयागराज, झांशी, बरेली, सहारनपुर, मुरादाबाद, गोरखपुर, अयोध्या, मेरठ, शाहजहांपुर, गाजियाबाद, मथुरा-वृंदावन और फीरोजाबाद या महापालिका क्षेत्रात आणि नगरपरिषद असलेल्या छोट्या शहरात सुविधा दिली जाणार आहे.

    Free WiFi facility in Uttar Pradesh, decision of Yogi government; Available in ten places in big cities and five places in small cities

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र