वृत्तसंस्था
दुर्ग : कोरोना काळात देशातल्या 80 कोटी गरीब जनतेला दर महिन्याला मोफत धान्य वाटपाची केंद्र सरकारची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढच्या 5 वर्षांसाठी वाढवली आहे. छत्तीसगड मधल्या दुर्ग मध्ये प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.Free ration distribution scheme to 80 crore poor extended for 5 years; Prime Minister Modi’s master stroke from Chhattisgarh!!
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतीय जनतेच्या आशीर्वादाने देशातल्या 80 कोटी गरीब जनतेला संकट काळात केंद्र सरकारने मोफत धान्य वाटले. ही योजना नंतरच्या काळातही सुरू ठेवली. आता पुढच्या 5 वर्षांसाठी केंद्र सरकार ही योजना तशीच सुरू ठेवणार आहे. यासाठी आपले आशीर्वाद आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे.
कोरोना काळातील लॉकडाऊन आणि आर्थिक संकट या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत धन्यवाद यामध्ये ते कुटुंबाला मोफत 35 किलो मोफत धान्य वाटप करण्यात येते. यात तांदूळ, गहू तसेच डाळी अन्य विशिष्ट पदार्थ यांचा समावेश आहे. जानेवारी 2023 मध्ये योजनेला केंद्र सरकारने मुदत वाढ दिली. यासाठी केंद्र सरकारने अधिक 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा आर्थिक बोजा सहन केला आहे.
आता ही मोफत धन्यवाद पुढच्या 5 वर्षांसाठी तशीच सुरू ठेवण्याचे जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवा मास्टर स्ट्रोक मारल्याचे मानले जात आहे.
Free ration distribution scheme to 80 crore poor extended for 5 years; Prime Minister Modi’s master stroke from Chhattisgarh!!
महत्वाच्या बातम्या
- बिग बॉस विजेता एल्विशवर सापांच्या तस्करीचा आरोप; गुन्हा दाखल, परदेशी मुलींना बोलावून रेव्ह पार्ट्या; 5 अटकेत
- कर्नाटकात आता झिका व्हायरसचा हायअलर्ट; डासांपासून होतो; 29 गर्भवती महिलांसह 33 जणांचे नमुने पुण्याला पाठवले
- ‘काँग्रेसने महादेवालाही सोडले नाही, भ्रष्टाचार करून तिजोरी भरली…’, भूपेश बघेल सरकारवर मोदींची टीका
- हिजबुल्लाहाचा म्होरक्या म्हणाला- गाझात मेलेल्यांना जन्नत मिळाली; अमेरिका-इस्रायल आम्हाला दाबू शकत नाहीत