• Download App
    एकीकडे मोफत वीज, दुसरीकडे दरवाढ; कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स आंदोलनाच्या पवित्र्यात; 22 जूनला पुकारला बंद!!|Free electricity on one hand, tariff hike on the other; Karnataka Chamber of Commerce in a posture of agitation; Closed on June 22!!

    एकीकडे मोफत वीज, दुसरीकडे दरवाढ; कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स आंदोलनाच्या पवित्र्यात; 22 जूनला पुकारला बंद!!

    वृत्तसंस्था

    बेंगलोर : कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्याबरोबर काँग्रेसने आश्वासन दिल्यानुसार 200 युनिट वीज मोफत दिली. पण त्यापुढे लगेच मोठी दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला भेटीस धरले, इतकेच नाहीतर औद्योगिक विजेची दरवाढ दीडपट केली. त्यामुळे आता कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आंदोलनाच्या पवित्र्यात आली असून येथे 22 जून रोजी संघटनेने बंद पुकारला आहे.Free electricity on one hand, tariff hike on the other; Karnataka Chamber of Commerce in a posture of agitation; Closed on June 22!!



    कर्नाटकात काँग्रेसने निवडून येण्यासाठी विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात केली. यात 200 युनिट पर्यंत सर्वांना वीज मोफत देण्याची घोषणा केली. ही घोषणा सिद्धरामय्या सरकारने अमलात आणली. पण त्याचवेळी 200 युनिटच्या पुढची वीज वापरणाऱ्यांसाठी दरवाढ केली. त्याचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवरच टाकला. त्यामुळे आता नागरिक तर बेजार झालेच, पण औद्योगिक वीज विजेच्या दरात पण वाढ झाल्याने छोटे – मध्यम उद्योजक हैराण झाले वीज दरवाढीचा प्रतिकूल परिणाम थेट उत्पादनावर झाला.

    त्यामुळे या वीज दरवाढीचा कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजने 22 जून 2023 रोजी बंद पुकारला आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येऊन एक महिना उलटतोय ना तोच काँग्रेसवर अशी नामुष्की आली आहे.

    Free electricity on one hand, tariff hike on the other; Karnataka Chamber of Commerce in a posture of agitation; Closed on June 22!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Congress : काँग्रेसच्या कर्मावर आणि भाजपच्या वर्मावर बोट ठेवत तिसऱ्या आघाडीला तोंड फुटले!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींनी हरियाणात जाऊन मारल्या merit च्या बाता; पण उथळ काँग्रेसने शेअर केल्या Narender – Surrender च्या टोप्या!!

    अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना!!