कोरोना विरुध्दच्या लढाईत देशातील सर्व केंद्रीय मंत्रालयांनी एल्गार पुकारला आहे. आता रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांसाठीही मोफत कोरोना चाचणी होणार आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या नागरिकांना मोफत जेवणही दिले जाणार आहे.Free corona testing and treatment for citizens now in railway hospitals
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना विरुध्दच्या लढाईत देशातील सर्व केंद्रीय मंत्रालयांनी एल्गार पुकारला आहे. आता रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये सामान्य गरिकांसाठीही मोफत कोरोना चाचणी होणार आहे.
त्याचबरोबर रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या नागरिकांना मोफत जेवणही दिले जाणार आहे.देशातील अनेक शहरांमध्ये रेल्वेची रुग्णालये आहेत. याठिकाणी रेल्वेचे कर्मचारी वगळता सामान्य नागरिकांनाही उपचार मिळतात.
परंतु, त्यांना त्यासाठी शुल्क मोजावे लागते. कोरोनाच्या महामारीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे बोर्डाच्या बैठकीत कोरोना विरुध्दच्या लढाईत पूर्ण क्षमतेने उतरण्याचा निर्णय घेण्यात आला.
रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये आता उपचाराच्या सुविधा वाढविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कोराना काळात ऑक्सिजनची कमतरता असल्याने जास्तीत जास्त ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्याचा निर्णयही घेण्यात आला. देशातील विविध शहरांना जोडणाऱ्या रेल्वेची सेवाही चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Free corona testing and treatment for citizens now in railway hospitals
महत्वाच्या बातम्या
- सोनू सूदच्या ट्विटनंतर चीन जागेवर आला, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर रोखले नसल्याचा केला दावा
- महाराष्ट्र, दिल्लीचा अपवाद वगळता सर्वच राज्यांनी उभारले स्वत : चे ऑक्सिजन प्लॅँट
- हृदयरोग असलेल्या अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात
- West bengal assembly elections 2021 results analysis : ममतादीदी हरोत किंवा जिंकोत… त्या बंगालमधून बाहेर पडतील…?? निदान बंगाली अस्मितेचा इतिहास तरी तसे दर्शवत नाही…
- आयर्लंडपासून ते लक्झेम्बर्ग, जपानपर्यंत तब्बल ४० देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले
- Kerala assembly elections 2021 results analysis : दक्षिणेतले समुद्रतरण, केरळच्या कॉलेजमधले पुशअप्स काँग्रेसची political immunity वाढवतील की…