• Download App
    आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू, राजस्थानमध्ये महिलांना मोफत बस प्रवास Free bus travel for women in Bangalore Rajasthan on International Women Day

    आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू, राजस्थानमध्ये महिलांना मोफत बस प्रवास

    (संग्रहित छायाचित्र)

    आज आंतरराष्ट्रीय महिल दिन सर्वत्र साजरा होत आहे. या निमित्त बंगळुरू आणि राजस्थान परिवहन विभागाच्यावतीने महिलांना एक खास भेट दिली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने(BMTC) शहरातील सर्व बसमध्ये महिला प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. Free bus travel for women in Bangalore Rajasthan on International Women Day

    महिलांसाठी सुरक्षा, सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी हा पुढाकार घेतला जात आहे, असे काल एका अधिकृत पत्रकाद्वारे सांगण्यात आले होते. मोठ्या संख्येने महिला शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील, त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण कमी होईल आणि शहरातील सार्वजनिक वाहतुकीतही सुधारणा होईल. असेही म्हटले होते. तसेच, एसी वज्र आणि वायु वज्र (विमानतळ) सेवेसह बीएमटीसीच्या बस सेवांमध्ये महिलांना मोफत प्रवास दिला जाणार आहे.


    काँग्रेस कदाचित पहिल्यांदाच एवढा काळ सत्तेबाहेर आहे, त्यामुळेच…केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशींनी लगावला टोला!


    राजस्थानमध्येही महिलांना मोफत बस प्रवास –

    जागतिक महिला दिनानिमित्त राजस्थानमधील महिलांनाही ही खास भेट मिळणार आहे. आजच्या दिवशी राज्यातील सुमारे साडेतीन कोटी महिला विनातिकीट बसमधून प्रवास करू शकणार आहेत. रोडवेज प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या दिवशी सुमारे ८ लाख महिला बसमधून प्रवास करतील.

    Free bus travel for women in Bangalore Rajasthan on International Women Day

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये