Tuesday, 13 May 2025
  • Download App
    चौथी विनाशिका भारतीय नौदलाची वाढविणार ताकद; ताफ्यात होणार दाखल Fourth destroyer to boost Indian Navy's strength; Will join the fleet

    चौथी विनाशिका भारतीय नौदलाची वाढविणार ताकद; ताफ्यात होणार दाखल

    वृत्तसंस्था

    पणजी : ‘आयएनएस मार्मगोवा’ असे नाव असलेली युद्धनौका येत्या रविवारी, १८ डिसेंबर रोजी नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. गोवा मुक्ती दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. Fourth destroyer to boost Indian Navy’s strength; Will join the fleet

    कोणती आहेत वैशिष्ट्ये? 

    विशेष म्हणजे या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र सज्ज केली जातात. या क्षेपणास्त्राची युद्धनौकेवरून मारा करणारी आवृत्ती सात वर्षांपूर्वी नौदलात दाखल करण्यात आली होती. सन २०१४पासून ताफ्यात दाखल करून घेतलेल्या ‘आयएनएस कोलकाता’ श्रेणीतील तीन विनाशिकांवर हे क्षेपणास्त्र आहे. तर वर्षभरापूर्वी ताफ्यात दाखल केलेली अत्याधुनिक ‘आयएनएस विशाखापट्टणम’ हीदेखील या क्षेपणास्त्राने सज्ज आहे.


    Navy Day 2021: नौदल प्रमुख म्हणाले, १० वर्षांचा रोडमॅप तयार, भारतात लवकरच स्वदेशी मानवरहित यंत्रणा असेल


    आता रविवारी दाखल होणारी ‘मार्मुगाव’ ही याच श्रेणीतील युद्धनौका आहे. माझगाव डॉक कारखान्यात तयार झालेली ‘मार्मगोव’ची उभारणी ४ जून २०१५ रोजी सुरू झाली. १७ सप्टेंबर २०१६ रोजी या युद्धनौकेचे जलावतारण झाले. विस्तृत समुद्री चाचण्यांनंतर मागील महिन्यात ती नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. आता १८ डिसेंबरला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतली जाणार आहे. नौदल गोदीत हा कार्यक्रम होईल

    Fourth destroyer to boost Indian Navy’s strength; Will join the fleet

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    DGMO Rajiv Ghai : भारताचे DGMO राजीव घई कोण आहेत?:गेल्या वर्षीच जबाबदारी मिळाली, 33 वर्षे सैन्यात सेवा केली

    Karnataka : कर्नाटक काँग्रेसने जम्मू-काश्मीरला पाकिस्तानचा भाग दाखवले; नंतर सोशल मीडिया पोस्ट काढून टाकली

    मोदींची आदमपूर हवाई तळाला भेट; बहादूर जवानांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!!