• Download App
    Kolkata law college कोलकाता येथील लॉ कॉलेजमधील सामूहिक बलात्कार

    Kolkata law college : कोलकाता येथील लॉ कॉलेजमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात चौथी अटक

    Kolkata law college

    जाणून घ्या, पोलिसांनी पकडलेला पिनाकी बॅनर्जी कोण आहे?


    कोलकाता – Kolkata law college येथील लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आणखी एक अटक केली आहे. पोलिसांनी लॉ कॉलेजचा गार्ड पिनाकी बॅनर्जी (५५ वर्षे) याला अटक केली आहे. विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात ही चौथी अटक आहे. कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीसह पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे.Kolkata law college

    एफआयआरनुसार, २४ वर्षीय पीडितेवर १५ जून रोजी कॉलेजच्या गार्ड रूममध्ये बलात्कार करण्यात आला होता. मुख्य आरोपीने तिला वारंवार मारहाण केली आणि धमकावले, तर इतर दोघे जण उभे राहून पाहत होते. घटनेदरम्यान कॉलेजचे गेट बंद होते आणि सुरक्षा रक्षकाला बाहेर वाट पाहण्यास भाग पाडण्यात आले होते असा आरोपही तिने केला.



    पिनाकी बॅनर्जी हा दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजचा सुरक्षा रक्षक आहे. तो ५५ वर्षांचा आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये घडलेल्या घटनेत सहभागी असल्याचा संशय असल्याने पिनाकीला कसबा पोलिसांनी अटक केली आहे.

    कोलकाता येथील लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात, मुख्य आरोपीने त्याच्या साथीदारांसह तिचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर ही घटना घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना पूर्वनियोजित होती की नाही हे देखील पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, “घटनांचा क्रम पाहता असे दिसते की मुख्य आरोपीचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.”

    Fourth arrest in Kolkata law college gang rape case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India-France : भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव ‘शक्ती-२०२५’ मुळे भारतीय सैन्याची क्षमता वाढणार

    Oman : ओमानमध्ये राहणाऱ्या सात लाख भारतीयांचं टेन्शन वाढणार?

    Parag Jain : आयपीएस अधिकारी पराग जैन असणार RAWचे नवीन प्रमुख