पंतप्रधान मोदी अन् अमित शहा यांच्या AI जनरेटेड व्हिडिओ प्रकरणी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Aam Aadmi Party आम आदमी पक्षाविरुद्ध अलिकडेच चार स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या एफआयआरमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरुद्ध अपमानास्पद कंटेट पसरवणे आणि संवैधानिक पदांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे असे आरोप आहेत.Aam Aadmi Party
पहिल्या एफआयआरनुसार, ‘आप’ने सोशल मीडियावर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरुद्ध अपमानास्पद पोस्ट आणि अॅनिमेटेड कंटेंट शेअर केले. या पोस्ट ‘जनतेच्या भावना भडकवण्याच्या’ उद्देशाने तयार केल्या गेल्याचे म्हटले जाते. पक्षाविरुद्ध बीएनएस आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एफआयआरमध्ये, ‘आप’ने गृहमंत्र्यांच्या आवाजाचा वापर करून दिशाभूल करणारी सामग्री पोस्ट केल्याचा आरोप आहे. ही पोस्ट धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी आणि गृहमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तयार करण्यात आली होती.
तिसऱ्या एफआयआरमध्ये असा आरोप आहे की ‘आप’ने पंतप्रधानांविरुद्ध मॉर्फ केलेले फोटो आणि चुकीची माहिती प्रसारित केली. ‘सामाजिक रचनेला हानी पोहोचवण्याच्या’ आणि पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हा मजकूर शेअर करण्यात आला होता.
चौथ्या एफआयआरमध्ये, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर राम गुप्ता यांच्यावर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबद्दल दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा आरोप आहे. पोस्टमध्ये असे म्हटले होते की पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे २,७०० कोटी रुपयांमध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. एफआयआरमध्ये हा दावा पूर्णपणे खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे..
Four FIRs filed against Aam Aadmi Party
महत्वाच्या बातम्या
- Basavaraj Teli आष्टीचा जावई येथे आणून बसविला, एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलीवर वाल्मीक कराडच्या बायकोचा आरोप
- Delhi : दिल्लीतील ४०० शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक
- Sanjay Raut : संजय राऊतांना अचानक झाली भाजपची आठवण अन् काँग्रेसला दिलेला सल्ला
- PM Modi : IMDच्या १५० व्या स्थापना दिनी पंतप्रधान मोदींनी सुरू केले ‘मिशन मौसम’