मुख्मंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिली माहिती,जाणून घ्या काय म्हणाले?
विशेष प्रतिनिधी
इंफाळ : मणिपूरमध्ये जुलैमध्ये झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चार जणांना अटक केली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. हे तेच लोक आहेत ज्यांचे फोटो गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर समोर आले होते. Four arrested in connection with brutal murder of students in Manipur two in custody
या चौघांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. राज्याची राजधानी इंफाळ येथून दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या चार जणांना आसाममधील गुवाहाटी येथे नेण्यात आले आहे.इंफाळपासून ५१ किमी अंतरावर असलेल्या चुराचंदपूर या डोंगराळ जिल्ह्यात पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईदरम्यान संशयितांना पकडण्यात आले. चुरचंदपूरमध्ये ३ मे रोजी जातीय हिंसाचार सुरू झाला होता.
संशयितांना अटक केल्यानंतर, सुरक्षा दल त्वरीत विमानतळावर पोहोचले, जेथे सीबीआयचे पथक त्यांची वाट पाहत होते. सीबीआयच्या पथकाने संशयितांसह संध्याकाळी 5:45 वाजता इंफाळहून गुवाहाटीकडे उड्डाण केले.
मणिपूर हिंसाचाराचे सीमापार ‘कनेक्शन’, NIAने कटाबाबत केला सर्वात मोठा खुलासा
मुख्मंत्री एन. बिरेन सिंह ही माहिती देताना म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार, विशेष संचालक अजय भटनागर यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांसह सीबीआयचे विशेष पथक २७ सप्टेंबरपासून मणिपूरमध्ये तळ ठोकून आहे. आज (1 ऑक्टोबर) सीबीआय, लष्कर, आसाम रायफल्स आणि राज्य सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने दोन तरुण विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी चार संशयितांना चुरचंदपूर जिल्ह्यातून अटक केली आहे. एका जघन्य गुन्ह्याच्या प्रकरणात एक मोठं यश मिळालं आहे .
Four arrested in connection with brutal murder of students in Manipur two in custody
महत्वाच्या बातम्या
- ”आपल्या कुटुंबातील हे कार्ट असे निपजल्याचे बघून बाळासाहेबांना खूप दुःख झाले असेल”
- राहुल गांधी ओबीसी सचिवांविषयी विचारतात, पण काँग्रेसच्या राजवटीत ओबीसी सचिव होते किती??, वाचा!!
- तामिळनाडू : कुन्नूरमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ८ ठार, ३५ जखमी
- महत्त्वाची बातमी : दोन हजाराच्या नोटा बदलण्याची तारीख वाढवली, RBIने जारी केले नवीन परिपत्रक