• Download App
    सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे निधन Founder of Sulabh International Dr Bindeshwar Pathak passed away

    सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे निधन

     पंतप्रधान मोदींनी ट्विट करून व्यक्त केला शोक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे आज (मंगळवार, १५ ऑगस्ट) निधन झाले. डॉ.बिंदेश्वर पाठक यांनी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. त्याच्या हृदयाचे ठोके अचानक बंद झाल्यानंतर डॉक्टरांनी कार्डियाक पल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) च्या मदतीने त्यांना श्वास देण्याचा प्रयत्न केला. मात्र यात डॉक्टरांना यश न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. Founder of Sulabh International Dr. Bindeshwar Pathak passed away

    दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून डॉ.बिंदेश्वर पाठक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये मोदींनी लिहिले आहे की, “डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे निधन हे आपल्या देशाचे मोठे नुकसान आहे. ते द्रष्टे व्यक्ती होते. ज्यांनी सामाजिक प्रगतीसाठी आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले.”

    दिवंगत बिंदेश्वर पाठक हे बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील रहिवासी होते. 1970 मध्ये त्यांनी सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनची स्थापना केली. बिंदेश्वर पाठक सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असत.  त्यांनी सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केली, जी मानवी हक्क, पर्यावरणीय स्वच्छता, उर्जेचे अपारंपरिक स्त्रोत, कचरा व्यवस्थापन आणि सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते.

    सुलभ इंटरनॅशनल अंतर्गत लोकांना स्टेशन, बस स्टँड जवळील शौचालयात जाण्याची सुविधा मिळते. अत्यल्प पैसे खर्च करून लोकांना सर्व सुविधा सहज मिळतात. अल्पावधीत सुलभ इंटरनॅशनल सामाजिक बदलाचे सूत्रधार म्हणून उदयास आले आहे, ज्यांनी लाखो सुलभ शौचालये बांधून अल्पशिक्षित लोकांनाही रोजगार दिला आहे. तसेच देशभरात शेकडो सुलभ कम्युनिटी कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहेत.

    Founder of Sulabh International Dr Bindeshwar Pathak passed away

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!