विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Jaideep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी आज सहा वाजता सुरू होऊन आज रात्रीपर्यंत देशाला नवीन उपराष्ट्रपती मिळणार आहे. जवळपास दीड महिन्यापेक्षा जास्त काळापासून उपराष्ट्रपतीपद रिक्त आहे. दरम्यान माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी केंद्र सरकारकडे एक मागणी केली आहे.
आपला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून गायब असलेले माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी नवीन उपराष्ट्रपती पदावर येण्याच्या आधीच केंद्र सरकारकडे पत्र लिहून एक मागणी केली आहे. गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाला गेलेल्या पत्रात जयदीप धनखड यांनी दिल्लीमध्ये बंगला मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.
मूळचे हरियाणाचे असणारे जयदीप धनखड हे सध्या अभय चौटाला यांच्या फार्म हाऊसवर राहत आहेत. पदावरून निवृत्ती झाल्यावर राष्ट्रपतींना दिल्ली राजधानी क्षेत्रात किंवा इतरत्र रहिवासासाठी बंगला देण्याची तरतूद आहे. मात्र उपराष्ट्रपती पदासाठी अशी कुठलीही औपचारिक तरतूद नाही.
उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून जयदीप धनखड सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रसारमाध्यमांसमोर आलेले दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसचा आमदार म्हणून पेन्शन मिळण्यासाठी सुद्धा अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर तात्काळ निर्णय घेत त्यांना ती पेन्शन लागूही करण्यात आली आहे. आता त्यांनी शासकीय निवासस्थानासाठी अर्ज केला आहे.
उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना उपराष्ट्रपती पदाचे निवासस्थान खाली करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर ते नॅशनल लोक दल चे नेते अभय चौटाला यांच्या खाजगी फार्म हाऊस वर राहायला गेले आहेत.
गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाने अजून तरी त्यांना बंगला दिलेला नाही. परंतु लवकरच त्यांना तो दिला जाईल असे बोलले जात आहे. लुटियन्स दिल्ली मधील एपीजे अब्दुल कलाम रोडवर असणारा 34 नंबरचा बंगला त्यांना दिला जाऊ शकतो अशी माहिती आहे.
Former Vice President Jaideep Dhankhar made this demand to the Center…
महत्वाच्या बातम्या
- Subrata Roy’ : सुब्रत रॉय यांच्या मुलाला ईडीने फरार घोषित केले, 1.74 लाख कोटींच्या घोटाळ्यात सहाराविरुद्ध आरोपपत्र
- Vice Presidential election : राहुल गांधी आणि विरोधकांचा मतचोरीच्या मुद्द्यावरून बाहेर बवाल; पण विरोधकांपुढे खासदारांचे संख्याबळ टिकवण्याचे खरे आव्हान!!
- Hockey Asia Cup : भारताने चौथ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव
- Adani Group : अदानी ग्रुप 2032 पर्यंत 5.34 लाख कोटींची गुंतवणूक करणार, अक्षय ऊर्जा आणि ट्रान्समिशनवरही फोकस