वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बंदी उठल्यानंतर फेसबुकवर परतले आहेत. शुक्रवारी ट्रम्प यांची पहिली फेसबुक पोस्ट होती, “आय एम बॅक.” 6 जानेवारी 2021 रोजी मेटाने कॅपिटल हिल दंगलींवरील प्रक्षोभक पोस्टसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते निलंबित केले होते.Former US President Trump returned to Facebook after the ban was lifted, the first post – I’m back!!
ट्रम्प यांनी ‘मी परत आलो आहे’ अशा शब्दांसह 12 सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात 2016च्या निवडणुका जिंकल्यानंतरचे त्यांचे विजयी भाषण दिसते. या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांनी 2024च्या निवडणुकीचा प्रचारही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओमध्ये ट्रम्प यांनी त्यांचे प्रसिद्ध “मेक अमेरिका ग्रेट अगेन” घोषवाक्य वापरले, जे त्यांच्या शेवटच्या अध्यक्षीय मोहिमेदरम्यान लोकप्रिय झाले.
या वर्षी जानेवारीमध्ये मेटाने त्यांचे खाते पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आणि फेब्रुवारीमध्ये मेटाने ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम खाते बहाल केले. एनबीसी न्यूजने वृत्त दिले की, मेटाचे पॉलिसी कम्युनिकेशनचे संचालक अँडी स्टोन यांनी याला दुजोरा दिला.
दोन वर्षांपूर्वी फेसबुकने घातली होती बंदी
6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकन संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फेसबुकने बंदी घातली होती. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दावा केला आहे की 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानात हेराफेरी झाली होती. त्यानंतरच फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट हिंसा भडकावल्याच्या आरोपावरून सस्पेंड केले होते. ट्विटरनेही डोनाल्ड ट्रम्पवर बंदी घातली आहे. पण एलन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू करण्यात आले.
यूट्यूबने रिस्टोअर केले डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते
यूट्यूबनेही शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते बहाल केले. आजपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या चॅनेलवर यापुढे बंदी नाही आणि ते नवीन कंटेंट अपलोड करू शकतात, असे यूट्यूब इनसाइडर्सने ट्विटरवर सांगितले.
यूट्यूबने म्हटले आहे की, आम्ही निवडणुकीपूर्वी वास्तविक जगात हिंसाचाराच्या सततच्या जोखमीचे काळजीपूर्वक मूल्यांकन केले, मतदारांना प्रमुख राष्ट्रीय उमेदवारांकडून समानतेने ऐकण्याची संधी संतुलित केली. ट्रम्प यांचे चॅनल यूट्यूबवरील इतर कोणत्याही चॅनेलप्रमाणे आमच्या धोरणांच्या अधीन राहील. महत्त्वाचे म्हणजे 6 जानेवारी 2021 रोजी यूएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांची अनेक सोशल मीडिया खाती निलंबित करण्यात आली होती. अलीकडेच ट्रम्प यांनी अमेरिकेतील 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे.
द वॉशिंग्टन पोस्टच्या मते, ट्रम्प यांना आता त्यांच्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब खात्यांवर पूर्ण अॅक्सेस आहे. 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांच्या सोशल मीडियाच्या प्रभावामुळे त्यांना मदत झाली असण्याची शक्यता आहे.
Former US President Trump returned to Facebook after the ban was lifted, the first post – I’m back!!
महत्वाच्या बातम्या
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने जारी केले अटक वॉरंट!
- फरार बुकी अनिल जयसिंघानियाचा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा फोटो व्हायरल; पण तो नेमका केव्हाचा??
- विरोधी ऐक्याची कोलकत्यात चर्चा; कर्नाटकात काँग्रेसचा ऐक्याला सुरूंग!!
- नवीन पेन्शन योजनेत शिंदे – फडणवीस सरकार करणार सुधारणा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय