वृत्तसंस्था
मॉस्को : युद्ध ताबडतोब थांबवावे, असे आवाहन युक्रेनच्या माजी राष्ट्रपतींनी केले आहे. राशियाबरोबर शांततापूर्ण चर्चेची गरज त्यांनी व्यक्त केली. Former Ukrainian president calls on current Ukrainian president Zelensky to end war
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने युद्ध भडकले आहे. त्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे माजी राष्ट्रपती व्हिक्टर युकोविच यांनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलन्स्की यांना युद्ध ताबडतोब थांबविण्याचे आवाहन केले आहे.
सध्या ते रशियात राहत आहेत. २०१४ मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी रशियात राहण्याचा निर्णय घेतला. विद्यमान राष्ट्रपती झेलन्स्की यांची सत्ता उलथून टाकून युकोविच यांना पुन्हा सत्तेवर आणण्याची योजना रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांची आहे.