जाणून घ्या, त्यांना आता कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Shaktikant Das रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मोदी सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. शक्तिकांत दास यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव-२ नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळासोबतच संपेल.Shaktikant Das
ते 2018मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नियुक्त झाले होते आणि 10 डिसेंबर 2024 रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला होता. आदेशानुसार ते पंतप्रधानांचे मुख्य सचिव-१ डॉक्टर पीके मिश्रा यांच्यासोबत पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून काम करतील.
केंद्र सरकारच्या नियुक्ती समितीकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले गेले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शक्तिकांत दास, आयएएस(निवृत्त) यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव-२ पदावरील नियुक्तीस मंजुरी दिली आहे. ही नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रभावी राहील. त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळासोबत किंवा पुढील आदेशापर्यंत कायम राहील.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरशी संबंध असलेले 67 वर्षीय शक्तिकांत दास तामिळनाडू कॅडेरच्या 1980च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी केंद्र आणि तामिळनाडू सरकारांसाठी विविध पदांवर काम केले आहे. केंद्रात त्यांना विविध टप्प्यात आर्थिक व्यवहार सचिव, वित्त सचिव आदी पदांच्या जबाबदारी सांभाळलेली आहे. ते दिल्लीतील प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजचे विद्यार्थी होते.
Former RBI Governor Shaktikant Das is the Principal Secretary to Prime Minister Modi-2
महत्वाच्या बातम्या
- Amit Shah सहकारी बँकांनी प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक,केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आवाहन
- Bangladesh : बांगलादेशात अराजकता सुरूच, बीएनपी नेत्याची मारहाण करत हत्या!
- Madan Rathore : भाजपच्या राजस्थान प्रदेशाध्यक्ष पदावर मदन राठोड यांची बिनविरोध निवड!
- Gaza : गाझा पुननिर्माणासाठी अरब देशांचा पुढाकार, 5 वर्षांत विकसित करण्याचे उद्दिष्ट; सहा देश आले एकत्र