बीजेडीने शुक्रवारी पक्षविरोधी कारवायांसाठी कुमार यांची हकालपट्टी केली होती.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिजू जनता दलाचे (बीजेडी) माजी राज्यसभा सदस्य सुजित कुमार ( Sujit Kumar ) यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बीजेडीने शुक्रवारी पक्षविरोधी कारवायांसाठी कुमार यांची हकालपट्टी केली होती.
सुजित कुमार यांनी पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.
बीजेडीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, पक्षविरोधी कारवायांमुळे कुमार यांची बीजेडीतून तत्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, “ज्या पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले त्याच पक्षाची त्यांनी निराशा केली आहे.
तसेच त्यांनी कालाहंडी जिल्ह्यातील लोकांच्या आशा आणि आकांक्षाही धुळीस मिळवल्या आहेत. दरम्यान, कुमार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे.
Former Rajya Sabha member of BJD Sujit Kumar joins BJP
महत्वाच्या बातम्या
- Solution Provider : पंतप्रधान मोदींच्या यशस्वी परराष्ट्र धोरणामुळे आज भारत जगात ‘सोल्युशन प्रोव्हायडर’च्या भूमिकेत
- Sitaram Yechury : सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक, दिल्लीतील ‘AIIMS’मध्ये व्हेंटिलेटरवर हलवले
- Mohan Bhagwat : समर्पित संघ स्वयंसेवकांमुळे पूर्वांचल – मणिपूरमधल्या स्थितीत सुधारणा; सरसंघचालकांचा विश्वास!
- Vladimir Putin : ‘भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थ होऊ शकतात…’, युक्रेन युद्धादरम्यान शांतता चर्चेवर पुतिन यांची मोठी घोषणा