• Download App
    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणतात, इम्रान खान यांच्या आत्महत्येची वाट पाहतोय|Former Pakistani Prime Minister Nawaz Sharif says he is waiting for Imran Khan to commit suicide

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणतात, इम्रान खान यांच्या आत्महत्येची वाट पाहतोय

    विशेष प्रतिनिधी

    लंडन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये जाण्याऐवजी आत्महत्या करू असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते. त्यावरून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी टीका केली असून इम्रान खान यांच्या आत्महत्येची वाट पाहत आहे.Former Pakistani Prime Minister Nawaz Sharif says he is waiting for Imran Khan to commit suicide

    लाहोरमध्ये पाकिस्नान मुस्लिम लीग-नवाज पक्षाने एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शरीफ यांनी आभासी माध्यमातून मार्गदर्शन केले. शरीफ म्हणाले, खान म्हणतात की, आंततराराष्ट्रीय नाणेनिधीत जाण्याऐवजी आपण आत्महत्या करू. मग ते असे कधी करणार, याची वाट आम्ही पहात आहोत. भारतात त्यांना लष्कराचे बाहुले म्हटले जाते.



    अमेरिकेत त्यांना महापौरापेक्षाही कमी अधिकार असल्याचे म्हटले जाते. ते सत्तेत कसे आले, हे जगाला माहीत आहे. सर्वसामान्यांच्या मतांवर सत्तेत आले नाहीत. त्यांनी सैन्याच्या मदतीने सत्ता मिळवली आहे. खान यांच्यासारख्या अयोग्य आणि नाकर्त्या व्यक्तीच्या हाती पाकिस्तानची सत्ता दिली आहे.

    त्यामुळे देश अधोगतीकडे चालला आहे. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. घटनेला कधीही सर्वोच्च मानले नाही. कधी शपथेचा सन्मान केला नाही. पाकिस्तानला प्रगतीकडे वाटचाल करायचे असेल, तर भूतकाळातून काही शिकावे.

    नवाज शरीफ 2019 पासून लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना लाहोर उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी परदेशात उपचारासाठी जाण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर ते अजून मायदेशी परतले नाहीत.

    Former Pakistani Prime Minister Nawaz Sharif says he is waiting for Imran Khan to commit suicide

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत