• Download App
    पराभवाच्या आत्मचिंतनात भाजपला धक्का; सत्तेच्या वळचणीला आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सोडून गेल्या!!|Former NCP leader and central minister suryakanta patil quits BJP

    पराभवाच्या आत्मचिंतनात भाजपला धक्का; सत्तेच्या वळचणीला आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सोडून गेल्या!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणुकीत केंद्रात पुन्हा मोदी सरकार आले असले तरी भाजपने स्वबळाचे बहुमत गमावले. महाराष्ट्रातही मोठा फटका बसला. त्याचा परिणाम आता दिसायला लागला आहे. पराभवाच्या आत्मचिंतनात भाजपला मोठा धक्का बसून सत्तेच्या वळचणीला आलेल्या माजी केंद्रीय मंत्री पक्षाला सोडून गेल्या आहेत.Former NCP leader and central minister suryakanta patil quits BJP



    राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून त्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसल्या होत्या. आता भाजपला पराभवाचा धक्का बसल्याबरोबर त्या सत्तेची वळचण सोडून गेल्या. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर देखील नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का बसला. त्याविषयीचे आत्मचिंतन करणारी बैठक माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी घेतली. या बैठकीनंतर सूर्यकांता पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून भाजपला सोडचिठ्ठी दिली. पक्षात बूथ स्तरापासून वेगवेगळ्या स्तरांवर काम करताना वेगळा अनुभव आला. कुठलीही कटूता न ठेवता पक्ष सोडत आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले.

    मात्र सूर्यकांता पाटील यांची गेल्या काही वर्षांमधली नाराजी लपून राहिली नव्हती. त्यांना हादगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. परंतु, भाजपमध्ये त्यांना तशी संधी मिळाली नाही. सूर्यकांता पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय संस्कृती आणि भाजपची राजकीय संस्कृती यांच्यात फारसा कधी मेळ बसला नाही. त्यातून त्या सतत राजकीय दृष्ट्या भाजपमध्ये अस्वस्थ राहिल्या. आता भाजपला पराभवाचा फटका बसल्यानंतर या भाजपच्या सत्तेची वळचण सोडून गेल्या त्या आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.

    सूर्यकांता पाटील यांना शरद पवारांनी केंद्रात ग्रामीण विकास राज्यमंत्री पदाची संधी दिली होती त्या मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्या पदावर काम करत होत्या परंतु 2014 नंतर संपूर्ण देशात मोठा बदल घडून भाजपची सत्ता आली त्यामुळे सूर्यकांता पाटील भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेल्या होत्या. दहा वर्षानंतर भाजप पुन्हा केंद्रात सत्तेवर आला पण भाजपने स्वबळावरचे बहुमत गमावले. या पार्श्वभूमीवर सूर्यकांता पाटील यांनी भाजपची सत्तेची वळचण सोडून दिली आहे.

    Former NCP leader and central minister suryakanta patil quits BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील