• Download App
    भाजप नेत्याच्या बांग्ला देशी पत्नीमुळे माजी सहपोलीस आयुक्त देवेन भारती अडचणीत|Former Joint Commissioner of Police Deven Bharti in trouble because of BJP leader's Bangladeshi wife

    भाजप नेत्याच्या बांग्ला देशी पत्नीमुळे माजी सहपोलीस आयुक्त देवेन भारती अडचणीत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजप नेते हैदर आझम यांची बांगलादेशी पत्नी रेश्मा खान (४८) हिला कथित मदत केल्याच्या प्रकरणात मुंबईचे तत्कालिन सहपोलीस आयुक्त देवेन भारती अडचणीत सापडले आहेत. हिच्यावर गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययू) गुन्हा दाखल केल्यावर पश्चिम बंगालमध्ये मॅजिस्ट्रेटने याच प्रकरणी नियुक्त केलेल्या कमिटीचा गोपनीय अहवाल तपास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.Former Joint Commissioner of Police Deven Bharti in trouble because of BJP leader’s Bangladeshi wife

    त्यातही खानचे पुरावे बोगस असल्याचे उघड झाले आहे.रेश्मा खानवर डिसेंबर २०२१ मध्ये सीआययूने गुन्हा दाखल केला. ती बांगलादेशी असल्याचे पुरावे माजी पोलीस अधिकारी दीपक कुरुलकर यांनी मालवणी पोलीस ठाण्यात दिले होते.



    त्यानंतर तपास अधिकाऱ्यांचे एक पथक २०२१ रोजी पश्चिम बंगालला गेले होते. तेथील डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या मॅजिस्ट्रेटने याप्रकरणी एक चौकशी समिती नेमली. त्याचा अहवाल सीआययूला मिळाला.सत्र न्यायालयाने सोमवारी खानचा अटकपूर्व जामीन नाकारत तिला अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यासही नकार दिल्यावर खान पुन्हा पसार झाली आहे.

    तिला मदत करणाऱ्या तत्कालीन मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे आणि कायदा सुव्यवस्था सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या समस्येत वाढ झाली असून, त्यांच्यावर अटकेची शक्यता नाकारता येत नाही.

    भारतात प्रवेश करण्यासाठी बांगलादेशी महिलेला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांनी देशद्रोह केला आहे. कोणताही अधिकारी देशासमोर मोठा नसून देशद्रोह्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि यासाठी आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत, असे माजी पोलीस अधिकारी व दीपक कुरुलकर यांचे वकील अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी सांगितले.

    Former Joint Commissioner of Police Deven Bharti in trouble because of BJP leader’s Bangladeshi wife

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र