• Download App
    माजी IPS संजीव भट्ट यांना २८ वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणी २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा Former IPS Sanjeev Bhatt sentenced to 20 years rigorous imprisonment in 28 year old drugs case

    माजी IPS संजीव भट्ट यांना २८ वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणी २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

    पानपूर न्यायालयाने बुधवारीच संजीव भट्ट यांना दोषी ठरवून निर्णय राखून ठेवला होता

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: गुजरातचे माजी आयपीएस संजीव भट्ट यांच्या अडचणीत वाढ होत आहे. संजीव भट्ट यांना २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथील न्यायालयाने १९९६ च्या अमली पदार्थ जप्ती प्रकरणात संजीव भट्ट यांना २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. Former IPS Sanjeev Bhatt sentenced to 20 years rigorous imprisonment in 28 year old drugs case

    पानपूर न्यायालयाने बुधवारीच संजीव भट्ट यांना दोषी ठरवून निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने गुरुवारी संजीव भट्ट यांना २० वर्षांची शिक्षा सुनावली. संजीव भट्ट यांच्याविरुद्धचा हा दुसरा खटला असून, त्यात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी कोठडीतील मृत्यू प्रकरणात दोषी ठरलेल्या माजी आयपीएस अधिकाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    बनासकांठा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जेएन ठक्कर यांनी भट्ट यांना राजस्थानमधील एका वकिलाला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यावेळी संदीप भट्ट बनासकाठा जिल्ह्याचे एसपी होते. गुजरात पोलिसांनी राजस्थानचे वकील सुमेरसिंग राजपुरोहित यांना १९९६ मध्ये ड्रग्ज कायद्यांतर्गत अटक केली होती. यावेळी पोलिसांनी पालनपूर येथील एका हॉटेलमधील वकिलाच्या खोलीतून अमली पदार्थ जप्त केल्याचा दावा केला होता. संजीव भट्ट यांना 2015 मध्ये भारती पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.

    Former IPS Sanjeev Bhatt sentenced to 20 years rigorous imprisonment in 28 year old drugs case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य