Former IPS Amitabh Thakur : माजी भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी अमिताभ ठाकूर हेही विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात प्रवेश करणार आहेत. अमिताभ ठाकूर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. Former IPS Amitabh Thakur Will Fight Election Against CM Yogi Adityanath
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : माजी भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी अमिताभ ठाकूर हेही विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात प्रवेश करणार आहेत. अमिताभ ठाकूर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर अकाली निवृत्त झाले. ठाकूर यांनी शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगामी विधानसभा निवडणूक ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात लढणार आहेत.
ठाकूर म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्व अलोकशाही, अराजक, दडपशाही आणि भेदभावपूर्ण कामे केली, यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात ते लढतील, मग आदित्यनाथ कोठूनही लढले तरी ते त्या ठिकाणी लढतील.
अमिताभ ठाकूर पुढे म्हणाले की, ही त्यांच्यासाठी तत्त्वांची लढाई आहे, ज्यात ते चुकीच्या गोष्टींना विरोध व्यक्त करतील.
गृह मंत्रालयाच्या निर्णयाचे पालन करून माजी आयपीएस अमिताभ ठाकूर यांना 23 मार्च रोजी अनिवार्य सेवानिवृत्ती देण्यात आली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की ठाकूर “ते सेवेच्या उर्वरित मुदतीसाठी कायम ठेवण्यास योग्य नाहीत”. जनहितार्थ, अमिताभ ठाकूर यांना त्यांची सेवा पूर्ण होण्यापूर्वी त्वरित प्रभावाने अकाली निवृत्ती दिली जात आहे,” असेही त्यात म्हटले होते.
Former IPS Amitabh Thakur Will Fight Election Against CM Yogi Adityanath
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानची कोरोना लसीवर बंदी, अफगाणचा 65 टक्के भूभाग व्यापला, राजधानी काबूलवरही लवकरच कब्जा करण्याची तयारी
- बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख उघड केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
- ‘मागण्या मान्य केल्या नाही तर ईडी, सीबीआय मागे लावू’, मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकरांना व्हॉट्सअॅपवर धमक्या
- “बी.कॉमचा निकाल जाहीर करा, नाहीतर उडवून टाकू!”, मुंबई विद्यापीठाला बॉम्बने उडवण्याची ईमेलद्वारे धमकी
- काबूलमधील 257 अफगाणी शीख आणि हिंदू कुटुंबांना वाचवा, वर्ल्ड पंजाबी ऑर्गनायझेशनचे गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन