• Download App
    फ्लाइंग सिक्ख मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा; उपचारांना चांगला प्रतिसाद; चंडीगडमधील हॉस्पिटलचा निर्वाळा Former Indian sprinter Milkha Singh, who was admitted to ICU of PGIMER Chandigarh

    फ्लाइंग सिक्ख मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा; उपचारांना चांगला प्रतिसाद; चंडीगडमधील हॉस्पिटलचा निर्वाळा

    वृत्तसंस्था

    चंडीगड – भारताचे प्रख्यात धावपटू स्प्रिंट मास्टर फ्लाइंग सिक्ख मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. त्यांना काहीच दिवसांपूर्वी कोरोनाचे निदान झाल्यामुळे ३ जून रोजी चंडीगडच्या पीजीआयएमइआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. Former Indian sprinter Milkha Singh, who was admitted to ICU of PGIMER Chandigarh

    त्यांच्यावर तेथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या बरोबरच त्यांच्या पत्नीलाही कोरोनाचे निदान झाले आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.



    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवाच मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबाबत फोन करून विचारपूस केली होती. मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत त्यांच्या प्रकृतीचे सगळे पॅरामीटर्स सुधारलेले दिसत आहेत. असे डॉक्टरांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

    Former Indian sprinter Milkha Singh, who was admitted to ICU of PGIMER Chandigarh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitin Nabin : नितीन नबीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, बिनविरोध निवड; शहा-नड्डा नामांकनाला उपस्थित

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू