• Download App
    माजी संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्या बंधूंचा भाजपमध्ये प्रवेश, उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढविणार|Former Defense Chief Bipin Rawat's brothers join BJP, will contest Assembly elections in Uttarakhand

    माजी संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्या बंधूंचा भाजपमध्ये प्रवेश, उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढविणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: देशाचे संरक्षण दल प्रमुख दिवंगत बिपीन रावत यांचे धाकटे बंधू कर्नल विजय रावत (सेवानिवृत्त) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रावत यांना उत्तराखंडमध्ये भाजपची उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांना डोईवाला विधानसभा मतदारसंघातून भाजप निवडणूक आखाड्यात उतरविले जाणार आहे.Former Defense Chief Bipin Rawat’s brothers join BJP, will contest Assembly elections in Uttarakhand

    विजय रावत यांनी दिल्लीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी धामी व भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विजय रावत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी विजय रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले व भाजपमध्ये प्रवेश दिल्याबद्दल आभार मानले.



    रावत म्हणाले, माझे वडील निवृत्त झाल्यानंतर भाजपात सामील झाले होते आणि आता मला ही संधी मिळाली आहे. या माध्यमातून मी उत्तराखंडच्या जनतेची सेवा करणार आहे. पक्षाने सांगितल्यास निश्चितपणे आपण निवडणूक लढवू .

    विजय रावत यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांच्या कायार्चा गौरव केला. धामी हे यशस्वीपणे उत्तराखंडचे नेतृत्व सांभाळत आहेत. उत्तराखंडसाठीचं त्यांचं जे व्हिजन आहे ते मला भावलं आहे. माझे दिवंगत बंधू बिपीन रावत यांनी उत्तराखंडसाठी जे स्वप्न पाहिले होते त्याच्याशी मिळतेजुळते धामी यांचे व्हिजन आहे, असे रावत म्हणाले.

    Former Defense Chief Bipin Rawat’s brothers join BJP, will contest Assembly elections in Uttarakhand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही