• Download App
    माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन यानी केले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक | Former cricketer Kevin Pietersen praises Indian Prime Minister Narendra Modi

    माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन यानी केले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचे संकट कमी झाले असून सर्व जग पुन्हा रूटीनवर येत असतानाच या रोगाचा नवीन व्हेरियंट आला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये याची पहिली केस आढळून आली आहे.

    Former cricketer Kevin Pietersen praises Indian Prime Minister Narendra Modi

    वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने या वायरसला ‘ओमीक्रोन व्हेरियंट’ असे नाव दिले आहे. दक्षिण आफ्रिकेत या व्हायरसमुळे कठोर प्रवास निर्बंध लादले गेले आहेत. या संकटकाळात भारताने आफ्रिकेला मदत केल्याचे कळल्यानंतर पीटरसनला आनंद झाला आहे. त्याने असे ट्विट केले आहे की, “तो काळजी घेणारा आत्मा भारताने पुन्हा एकदा दाखवला असून भारत हा खूप मनमिळावू लोक असलेला एक शानदार देश आहे.” हे लिहून पीटरसनने नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहे.


    PM MODI LIVE :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १० वाजता देशवासियांशी संवाद साधणार ; संपूर्ण देशाचं लक्ष…


    मेड इन इंडिया लसींचा पुरवठा करण्याचे वचन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आफ्रिकन राष्ट्रांना दिले आहे. या नवीन व्हायरसचा सामना करण्यासाठी भारत या देशांना मदत करणार असून पुरवठा covax द्वारे किंवा द्विपक्षीयपणे करण्यात येणार असल्याचे निवेदनात जाहीर केले आहे. पीटरसनचे भारतासोबत दीर्घकाळ संबंध आहेत. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल, रायझिंग पुणे सुपर जायंट, सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्वही केले आहे. पीटरसन बऱ्याच वर्षांपासून आयपीएलच्या ब्रॉडकास्टिंग टीमचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.

    Former cricketer Kevin Pietersen praises Indian Prime Minister Narendra Modi

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले