• Download App
    माजी नोकरशहा आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय हर्ष मंदर यांच्या अनाथाश्रमाचे उद्योग, अनाथ मुलांना पाठविले सीएए विरोधातील आंदोलनात, लैंगिक शोषणाचेही प्रकार|Former bureaucrat and Sonia Gandhi's close friend Harsh Mander's orphanage will be probed, orphans sent to protest against CAA, also forms of sexual abuse

    माजी नोकरशहा आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय हर्ष मंदर यांच्या अनाथाश्रमाचे उद्योग, अनाथ मुलांना पाठविले सीएए विरोधातील आंदोलनात, लैंगिक शोषणाचेही प्रकार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : माजी नोकरशहा आणि कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय हर्ष मंदर यांच्याकडून चालविल्या जाणाºया अनाथाश्रमातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील मुलांना सीएए विरोधातील (नागरिकत्व संशोधन कायदा) आंदोलनात पाठविण्यात आले होते. त्यांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी विष पेरण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे या अनाथाश्रमांमध्ये बाल लैंगिक अत्याचाराचे प्रकारही घडले आहेत.Former bureaucrat and Sonia Gandhi’s close friend Harsh Mander’s orphanage will be probed, orphans sent to protest against CAA, also forms of sexual abuse

    बाल हक्क कायद्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने दिल्ली उच्च न्यायालयाकडे या दोन्ही बालगृहांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बालकल्याणासाठी सरकारकडून मिळालेल्या निधीचा या बालगृहांकडून अपहार करण्यात आला आहे. त्यांच्या व्यवस्थापनातही अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.



    हर्ष मंदर यांच्याकडून मुलांसाठी उम्मीद अमन घर आणि मुलींसाठी खुशी रेनबो होम हे दोन अनाथाश्रम चालविले जातात. येथील वयाने मोठ्या मुलांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रचंड विष पेरण्यात आले. एका मुलाने तर सांगितले की मोदी केवळ हिंदूंचे ऐकतात आणि पाकिस्तानशी भांडण करतात.

    येथील चार-पाच मुली सीएए विरोधी आंदोलनात भाग घेण्यासाठी जंतर-मंतर येथेही गेल्या होत्या, असे एका मुलीन सांगितले. आम्हाला बिस्किट आणि ज्यूस देण्यात आला होता असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही आंदोलनात मुलांना सहभागी करून घेणे हे बेकायदेशिर आहे.

    हर्ष मंदर यांच्या दोन स्वयंसेवी संस्थांविरुध्द बाल हक्क कायद्याच्या उल्लंघनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल संरक्षण अधिकार आयोगाने (एनसीपीसीआर) केलेल्या तक्रारीनुसार उम्मीद अमन घर आणि खुशी रेनबॉ होम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या स्वयंसेवी संस्थां सेंटर फॉर इक्यूटी स्टडिजकडून (सीएसई) चालविल्या जातात. सीएसई चे संचालन सेवानिवृत्त आयएएस अधिकारी हर्ष मंदर यांच्याकडून केले जाते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर २०२० मध्ये एनसीपीआरच्या पथकाने अनाथाश्रमांची पाहणी केली होती.

    याठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाल्यावर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकाला अनाथाश्रमाला मिळालेल्या देणग्या आणि होणारा खर्च याबाबत काहीही सांगण्यास मंदर यांनी नकार दिला. आर्थिक अनियमितता असल्यानेच कागदपत्रे दडविण्यात आल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे.

    अनाथाश्रमामध्ये मुलांसाठी किमान सुविधाही नाही. त्यांच्या खोल्या दमट आणि अंधाºया आहेत. त्यामध्ये ओल येते. मुलांची नियमित आरेग्य तपासणीही करण्यात येत नाही. बालकांचे शोषण होऊ नये यासाठी कोणतीही नियमावली पाळली जात नव्हती, असेही आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. केवळ एका विशिष्ट धमार्तील मुलांनाच याठिकाणी प्रवेश देण्यात येतो. त्याचबरोबर मिळालेल्या निधीचा वापर धर्मांतरासाठीही करण्यात येत होता.

    Former bureaucrat and Sonia Gandhi’s close friend Harsh Mander’s orphanage will be probed, orphans sent to protest against CAA, also forms of sexual abuse

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!