• Download App
    आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक; भ्रष्टाचार प्रकरणी CIDची कारवाई! Former Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu Arrested CIDs action in the corruption case

    आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक; भ्रष्टाचार प्रकरणी CIDची कारवाई!

    नायडू यांच्यावर २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद : तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. टीडीपीने याबाबत माहिती दिली आहे. Former Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu Arrested CIDs action in the corruption case

    भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) नायडू यांच्यावर शनिवारी (९ सप्टेंबर) सकाळी कारवाई केली. नायडू यांच्यावर २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या शिबिरात विश्रांती घेत असताना नायडू यांना पहाटे ३ वाजता नांदयाल येथून अटक करण्यात आली. त्यांना अटक करण्यासाठी नांदयाल रेंजचे डीआयजी रघुरामी रेड्डी आणि सीआयडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला होता.

    Former Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu Arrested CIDs action in the corruption case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते