विशेष प्रतिनिधी
मुंबई : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरात त्यांचा पीए बिभव कुमार याने मारहाण केली. हे प्रकरण आता राजकीय दृष्टीने आणि त्याहीपेक्षा कायदेशीर दृष्टीने एवढे तापले आहे की कोणत्याही क्षणी केजरीवालांचा जामीन रद्द होऊन त्यांना स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात अटक होऊ शकते. पण केजरीवाल मात्र या सगळ्या प्रकरणात गप्प बसून आम आदमी पार्टीच्या प्रचारात मग्न आहेत.
स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना जबानी दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी जो FIR नोंदविला त्यातून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आले. बिभव कुमार याने स्वाती मालीवाल यांना कशी मारहाण केली. त्याचे व्हिडिओ देखील समोर आले. बिभव कुमार काल अरविंद केजरीवालांबरोबर लखनऊच्या दौऱ्यावर होता, पण पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर तो गायब झाला.
पण केजरीवाल त्यानंतर पंजाबच्या दौऱ्यावर गेले. अमृतसर मध्ये त्यांनी सुवर्ण मंदिराला भेट दिली. आम आदमी पार्टी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. आणि तिथून ते महाराष्ट्रात आधी भिवंडी आणि नंतर मुंबईत आले. या सगळ्या दौऱ्या दरम्यान केजरीवालांनी स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात एकही शब्द उच्चारला नाही.
दरम्यान, स्वाती मालीवाल यांची दिल्ली एम्स मध्ये वैद्यकीय तपासणी झाली. त्याच्या स्वतंत्रपणे नोंदी पोलिसांनी करून स्वाती मालीवाल यांची चौकशी आणि तपासणी केली. त्यांना तीस हजारी कोर्टात सादर केले. एम्स मधली तपासणी त्यानंतर तीस हजारी कोर्टातली सुनावणी यानंतर स्वाती मालीवाल लंगडत बाहेर आल्या. परंतु त्यांनी मीडियाला काहीही सांगितले नाही.
स्वाती मालीवाल यांनी दिलेल्या जबानीनुसार पोलिसांनी जो FIR एफ आय आर नोंदवला, त्यानंतर दिल्ली पोलीस आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी बिभव कुमार याच्या घरी जाऊन त्याला चौकशी आणि तपासाची नोटीस दिली. परंतु त्याच्या पत्नीने ती घेतली नाही म्हणून दिल्ली पोलीस आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी बिभव कुमार यांच्या घराच्या गेटवर त्या नोटीसा चिकटवल्या.
त्या पाठोपाठ दिल्लीचे पोलीस सायंकाळी 5.30 च्या सुमारास अरविंद केजरीवाल्यांच्या घरी पोहोचले. ज्या ड्रॉइंग रूम मध्ये स्वाती मालीवाल यांना मारहाण झाली, त्या ड्रॉइंग रूमची सगळी तपासणी दिल्ली पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने केली. दिल्ली पोलीस केजरीवालांच्या घरात असताना केजरीवाल मात्र स्वतः केजरीवाल मात्र मुंबई दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीच्या रॅलीत भाषण करण्यात मग्न होते. लखनऊ दौऱ्यात केजरीवाल यांनी अखिलेश यादव यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेतली तर मुंबई दौऱ्यात केजरीवाल यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या समावेत बीकेसी मध्ये महाविकास आघाडीच्या सभेला संबोधित केले.
Forensic team arrives at the residence of Delhi CM Arvind Kejriwal in connection with the AAP Rajya Sabha MP Swati Maliwal assault case.
महत्वाच्या बातम्या
- मान्सूनचे शुभवर्तमान : IMDचा अंदाज 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल, महाराष्ट्रात 9 ते 16 जूनदरम्यान आगमन
- संघाचं फडकं म्हणून उद्धव ठाकरेंकडून भगव्या ध्वजाजा अपमान!!
- स्वाती मालीवाल यांच्या जबानीनंतर दिल्ली पोलिसांमध्ये FIR दाखल; त्यात बिभव कुमारचे नाव, पण केजरीवाल अद्याप गप्प!!
- मनी लाँड्रिंग प्रकरणात मंत्री आलमगीरला धक्का; कोर्टाने EDला सहा दिवसांची दिली रिमांड