Vaccination in India : भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यास परवानगी देणारा, कोविडपासून संरक्षणासंदर्भातील एक महत्वाचे पाऊल म्हणता येईल असा निर्णय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने घेतला आहे. कोविन पोर्टलवर नोंदणीसाठी ओळख पटवणारा दस्तावेज म्हणून त्यांना त्यांचे पारपत्र वापरता येईल. या पोर्टलवर नोंदणी झाल्यावर त्यांना लसीकरणासाठी वेळ मिळवता येईल. Foreign nationals are now eligible for Vaccination in India
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यास परवानगी देणारा, कोविडपासून संरक्षणासंदर्भातील एक महत्वाचे पाऊल म्हणता येईल असा निर्णय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने घेतला आहे. कोविन पोर्टलवर नोंदणीसाठी ओळख पटवणारा दस्तावेज म्हणून त्यांना त्यांचे पारपत्र वापरता येईल. या पोर्टलवर नोंदणी झाल्यावर त्यांना लसीकरणासाठी वेळ मिळवता येईल.
भारतात विशेषतः महानगरांमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. या महानगरांमधील लोकसंख्येच्या जास्त घनतेमुळे कोविड-19 प्रसाराची शक्यताही मोठीच आहे. अशा संसर्गाची शक्यता लक्षात घेता सर्व पात्र लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे.
भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय आहे. यामुळे भारतात राहणाऱ्या पण लसीकरण न झालेल्या व्यक्तींकडून संसर्ग पसरण्याची शक्यता मंदावेल. त्यामुळे कोविड-19 संक्रमणापासून एकूणच संरक्षण मिळेल.
राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रम हा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाला. आता 18 वर्षे व त्यावरील वयाच्या सर्व नागरिकांसाठी हे लसीकरण आहे. देशात 9 ऑगस्ट 2021 पर्यंत लसीच्या 51 कोटींहून जास्त मात्रा देण्यात आल्या.
Foreign nationals are now eligible for Vaccination in India
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मिरात दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य, भाजप नेते गुलाम रसूल डार यांची पत्नीसह गोळ्या झाडून हत्या
- विवाहित महिलेवर ‘I Love U’ लिहिलेले पत्र फेकणेही गुन्हाच, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय
- केंद्र सरकार उद्या राज्यसभेत ओबीसी आरक्षण विधेयक सादर करण्याची शक्यता, भाजपचा खासदारांसाठी व्हीप जारी
- धक्कादायक : अवघ्या 8 वर्षांच्या हिंदू मुलाला पाकिस्तानात ‘ईशनिंदे’प्रकरणी फाशीची शक्यता, जगभरातून सुरू आहे विरोध
- PM Modi In UNSC : मोदी म्हणाले, पायरसी आणि दहशतवादासाठी सागरी मार्गांचा दुरुपयोग, सागरेच आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाइफलाइन