वृत्तसंस्था
सिंगापूर : सध्या सिंगापूर दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी येथे एका कार्यक्रमात भारतीयांसमोर बोलताना भारत-रशिया संबंधांवर उघडपणे भाष्य केले. ते म्हणाले, आजपर्यंत रशियाने भारताचे कधीच नुकसान केलेले नाही. या देशाशी भारताचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले असून दोन्ही देशांनी कायम परस्परांचे हित जपले आहे.Foreign Minister Jaishankar said – Russia has never harmed India; Both the countries have always protected each other’s interests
सिंगापूरमध्ये भारतीय समुदायाची संख्या प्रचंड आहे. या लोकांशी संवाद साधताना जयशंकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. विशेषत: सध्याच्या रशिया-युक्रेन वाद आणि जगभर या निमित्ताने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी रशियाची बाजू घेत या देशाशी भारताचे संबंध कसे कायम सौहार्दपूर्ण राहिले आहेत, याचे दाखले दिले. भारताचे विविध देशांशी असलेले संबंध पाहता त्या-त्या दृष्टिकोनातून याकडे पाहायला हवे, असे ते म्हणाले. भविष्यातही या दोन देशांतील संबंधांकडे विश्वासानेच पहायला हवे, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.
370 हटवल्याने लाभच
जम्मू-काश्मीरमध्ये पूर्वी लागू करण्यात आलेले 370 कलम ही तात्पुरती तरतूद होती. परंतु, यामुळे जम्मू-काश्मीरसह लडाखमध्ये भारताचे अनेक कायदे लागू करणे खोळंबले होते. आता 370 कलम हटवल्यामुळे सकारात्मक घडत आहेत.
पाकिस्तानचा दहशतवाद हाच उद्योग
परराष्ट्र मंत्री जयशंकर शनिवारपासून तीन आसियान देश सिंगापूर, फिलीपिन्स आणि मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शनिवारी त्यांनी पाकिस्तानवरही भाष्य केले होते. हा देश एखाद्या उद्योगासारखा दहशतवाद पोसत असल्याची टीका त्यांनी केली.
रशियाने कायम मदतच केली
मी रशिया-भारत संबंधांचा विचार केला तर रशियाने नेहमीच महत्त्वाच्या प्रसंगी मदत केली आहे. रशियामुळे भारताचा फायदा होणार की नुकसान, या प्रश्नाचे अगदी सहज सोपे उत्तर म्हणजे या देशाशी आमचे सलोख्याचे संबंध आहेत.
जयशंकर यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लूंग यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा कळवल्या. सध्याच्या जागतिक परिस्थितीत ली यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात दोन्ही देशांतील व्यावसायिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Foreign Minister Jaishankar said – Russia has never harmed India; Both the countries have always protected each other’s interests
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी संदेशखळी पीडितेला केला फोन, भाजपने बशीरहाटमधून दिली उमेदवारी
- कट्टर खालिस्तान विरोधी मुख्यमंत्री शहीद सरदार बेअंत सिंग यांचे नातू खासदार रवनीत सिंग बिट्टू भाजपमध्ये दाखल!!
- पूर्व आणि दक्षिणेतल्या राज्यांमधून खासदार संख्या वाढविण्याची भाजपला खात्री; पवार – ठाकरेंची फक्त महाराष्ट्रात 48 जागांमध्ये खेचाखेची!!
- पाकिस्तानच्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला; 4 दहशतवादी ठार, एक जवान शहीद; बलुच लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी