• Download App
    कृषी क्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी ; यंदा पाऊस 98 टक्के पडणार ; महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज Forecast for the 2021 South-west Monsoon Rainfall

    कृषी क्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी ; यंदा पाऊस ९८ टक्के पडणार ; महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज आज जाहीर केला आहे. त्यात 96 ते 104 टक्क्यांपर्यंत पाऊस पडणार असल्याचे म्हंटले आहे. Forecast for the 2021 South-west Monsoon Rainfall

    जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन पावसाचा अंदाज जाहीर केला. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
    पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव राजीवन म्हणाले की, “नैऋत्य मॉन्सूनमध्ये दीर्घकालीन सरासरीनुसार 98 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सून सामान्य राहील. ही कृषी क्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी आहे.



    महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस 

    यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात मागच्या वर्षीही चांगला पाऊस पडला होता. यंदाही त्याहून चांगली परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोबतचं दुष्काळी भागांनाही याचा चांगला फायदा होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

    ओडिशा, झारखंड, पूर्व यूपीत कमी पाऊस

    ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये कमी तर देशातील उर्वरीत भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाचा आहे. यंदा देशात मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या 98 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात सामान्यपेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. ला निना आणि एल निनोचा भारतीय मान्सूनच्या वाटचालीवर मोठा परिणाम होत असतो. यंदा एल निनोच्या प्रभावाची शक्यता कमी असल्याचे राजीवन म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने मान्सूनची वाटचाल अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे मान्सूनचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम दिसून येतो.

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!