विशेष प्रतिनिधी
तंजावर : तामिळनाडूतील तंजावर येथे बारावीत शिकणाºया लावण्यने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्यानंतर आत्महत्या केली. तिचा एक व्हिडीओ समोर आला असून धर्मांतराची सक्ती केल्यानेच आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.Forced to convert to Christianity, Lavanya commits suicide in Thanjavur, video reveals the truth
आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले मात्र उपचाराचा परिणाम त्याच्यावर झाला नाही. बुधवार, 19 जानेवारी रोजी तंजावर मेडिकल कॉलेज रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.
- ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विद्यार्थीनीचा छळ, कंटाळून विष प्राशन करून केली आत्महत्या
१७ वर्षीय लावण्य ही तंजावर येथील सेंट मायकल गर्ल्स होम या बोर्डिंग हाऊसमध्ये होती. एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात लावण्यने कबूल केले आहे की तिला वसतिगृहाच्या वॉर्डनने सतत शिवीगाळ केली आणि वसतिगृहातील सर्व खोल्या स्वच्छ करण्यास सांगितले.
तिला सतत ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप मुलीने केला आहे. या घटनांमुळे व्यथित झालेल्या तरुणीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. लावण्यचे वडील मुरुगानंदम यांना 10 जानेवारीला कळवण्यात आले की त्यांच्या मुलीला उलट्या आणि तीव्र पोटदुखीच्या तक्रारीनंतर 9 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुरुगानंदम यांनी लावण्यला तंजोर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलवले.
शुद्धीवर आल्यावर लावण्याने डॉक्टरांना आपली व्यथा सांगितली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉक्टरांनी तिरुकट्टुपल्ली पोलिसांना माहिती दिली. पोलिस लावण्यची चौकशी करायला आले. चौकशीच्या आधारे पोलिसांना कळले की बोर्डिंग स्कूलच्या वॉर्डनने लावण्यचा छळ केला आणि तिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वॉर्डन सकयामारी याला अटक केली. लावण्यचा बुधवारी रात्री १९ जानेवारीला मृत्यू झाला. या घटनेने तिरुकट्टुपल्ली परिसरात खळबळ उडाली आहे.
लावण्याचा एक व्हिडीओ समोर आलाअसून या व्हिडिओमध्ये मृत मुलीने वसतिगृहात काम करणाऱ्या वॉर्डनवर आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. वॉर्डन वसतिगृहात काम करायला लावायची आणि त्यामुळे तिचा अभ्यास व्हायचा नाही, अशी तक्रार केल्यानेच शाळेने जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या व्हिडीओचे चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आणि व्हिडीओचे चित्रीकरणासाठी वापरलेला फोन जमा करण्याचे आदेश दिले.
Forced to convert to Christianity, Lavanya commits suicide in Thanjavur, video reveals the truth
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीमध्ये संतापजनक घटना , एका बलात्कार पीडित महिलेचं केलं मुंडण ; तोंडाला फासल काळं
- राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर ; खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे राखीव
- वैद्यकीय महाविद्यालयांच्या अध्यापकांच्या मानधनात वाढ होणार
- धुळ्यात सर्वात नीचांकी तापमानाची नोंद; पारा @ २.८ अंश सेल्सिअसवर पोचला
- ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे पुण्यामध्ये निधन
- महाराष्ट्राच्या समृद्ध जैवविविधतेचे देशाला दर्शन; राजपथावर चित्ररथाने अनेकांची मने जिंकली