• Download App
    मागील 48 वर्षांपासून ह्या साधूंनी आपला एक हात वर केला आहे, काय आहे ह्या मागचे कारण? | For the last 48 years, this sadhus has raised his one hand nonstop, what is the reason behind this?

    मागील 48 वर्षांपासून ह्या साधूंनी आपला एक हात वर केला आहे, काय आहे ह्या मागचे कारण?

    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी : व्यायाम करताना तुम्ही स्ट्रेचिंग केलं आहे का? दोन तीन मिनिटांसाठी हात वर केला की आपला हात दुखायला लागतो. पण भारतामध्ये असे एक साधू आहेत ज्यांनी मागील 48 वर्षांपासून आपला हात वर केला आहे, तो अजिबात खाली केलेला नाहीये. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.

    For the last 48 years, this sadhus has raised his one hand nonstop, what is the reason behind this?

    अमर भारती हे एक बँकमध्ये काम करणारे साधारण नोकरदार होते. घरी बायको मुलं यामुळे ते संसारामध्ये सुखी होते. एक दिवस त्यांना अचानक अध्यात्माची ओढ लागली आणि त्यांनी आपल्या संसाररूपी जीवनाचा त्याग करून आध्यात्माचा मार्ग पकडला. धर्माच्या वाटेवर चालण्याचा त्यांनी निग्रह केला. जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावा आणि विश्वास निर्माण व्हावा यासाठी मागील 48 वर्षांपासून आपला हात कधीही खाली केलेला नाही.


    Nobel Peace Prize : मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना 2021 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर


    त्यांच्या या विक्रमामुळे बरेच लोक त्यांचे कौतुक करतात. तर बरेच लोक त्यांना वेडे देखील समजतात.

    एका मुलाखतीमध्ये अमर भारती यांनी सांगितले की, मला शंकराची भक्ती करायची आहे. आणि या जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठीच त्यांनी कधीही हात खाली न कारण्याचा अट्टहास धरला आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर आजवर बरेच चमत्कार झालेले आहेत. माझ्या ह्या निग्रहामुळे मला एका वेगळ्या शक्तीचा अनुभव होतो.

    सुरुवातीला त्यांना खूप वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. पण एकदा इच्छाशक्ती दृढ असेल तर काहीही होऊ शकते अश्या त्यांच्या विचारातून 1973 पासून त्यांनी आपला हात वर केलेला आहे तो अजिबात खाली केलेला नाहीये.

    For the last 48 years, this sadhus has raised his one hand nonstop, what is the reason behind this?

     

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत